Pune Crime : टोळ्यांचा संघर्ष ; पण पुणे पोलिसानी उधळला खुनाचा कट .. पहा प्रकरण

पुणे -प्रतिनिधी

प्रतिस्पर्धी उमाप टोळीच्या एका सदस्याची हत्या करण्याचा शेखापुरे टोळीने रचलेला खतरनाक कट गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२, युनिट-०२ आणि युनिट-०५ यांच्या संयुक्त कारवाईत उद्ध्वस्त करण्यात आला. या कटात सहभागी असलेल्या तिघा प्रमुख आरोपींना अवैध पिस्तुलांसह बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.(Pune Crime )

या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित मल्लिकार्जुन शेखापुरे याच्याबाबत खंडणी विरोधी पथक-२ चे पोलीस अमलदार आजाद पाटील यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार त्याला सोमवारी पेठ परिसरातून अटक करण्यात आली. दुसरा आरोपी निखिल ज्ञानोबा लगाडे (वय २३, राहणार गुलटेकडी) याच्याबाबतची माहिती युनिट-०५ चे अकबर शेख आणि राहुल ढमढेरे यांना मिळाली होती. तिसरा आरोपी अन्वर उर्फ जंबा शाकीर शेख (वय २३, राहणार औद्योगीक वसाहत, गुलटेकडी) याच्याबाबतची माहिती युनिट-०२ चे शंकर नेवसे, विनोद चव्हाण, उज्ज्वल मोकाशी आणि विनायक वाघमारे यांना प्राप्त झाली होती.

कारवाईची संपूर्ण कथा: शेखापुरे टोळीने उमाप टोळीच्या सदस्यावर हल्ला करण्यासाठी अवैध पिस्तुले मिळवली होती. या हालचालींची गुप्तचर विभागाकडून माहिती मिळताच पोलिसांनी १३ मार्च रोजी सापळा रचून काही आरोपींना शस्त्रांसह ताब्यात घेतले. फरार मुख्य आरोपी शेखापुरेला २ एप्रिल रोजी पकडण्यात आले. उरलेल्या आरोपींना त्यांच्या लपोवाट्यांवर छापे टाकून अटक करण्यात आली.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन: ही मोठी कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक आणि शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक राजमाने (खंडणी विरोधी पथक-२), संदीप पवार (युनिट-०५) आणि अश्विनी जगताप (युनिट-०२) यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी हे यश मिळवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *