Pune : खाकी ऑन ड्युटी नशेत; दोन पोलिसांचे तडकाफडकी निलंबन


पुणे – प्रतिनिधी

काळेपडळ पोलीस ठाण्यातील (Kalepadal Police)दोन पोलिस हवालदारांना ऑन ड्यूटी दारूच्या नशेत वावरण्याबद्दल तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी या बेजबाबदार वर्तनाची गंभीर दखल घेतली असून, पुणे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.(Pune Cop Scandal )

हवालदार सचिन सुरेशराव जाधव (Sachin Jadhav)हे २१ मार्चला लोणी काळभोर येथील एमआयटी (एडीटी) विद्यापीठात पुणे शहर पोलीस भरती २०२४-२५ च्या लेखी परीक्षेच्या बंदोबस्तावर होते .(Kalepadal Suspension) सायंकाळी सहा वाजता वरिष्ठ निरीक्षकांच्या पाहणीत ते कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करून गैरवर्तन करताना आढळला. ससून रुग्णालयातील वैद्यकीय तपासणीत त्याच्या रक्तात मद्य आढळले.(Police Constables )
एका अत्यंत महत्त्वाच्या शासकीय प्रक्रियेत अशा प्रकारे बेजबाबदार वर्तन केल्याने प्रशासनाने त्यांची गंभीर दखल घेतली

तर हवालदार संजय अंकुश कराड (Sanjay Karad)हे ९ मार्चला उंड्री पोलीस चौकीवर ड्युटी सोडून काळेपडळ पोलीस ठाण्यात दुचाकीने आले . दुपारी दोन वाजता नशेत दुचाकीचे नियंत्रण सुटून बाकड्यावर बसलेल्या महिला तक्रारदाराला धडक दिली. किरकोळ जखमी झालेल्या महिलेनंतरही त्याने तेथील लोकांशी हुज्जत घातली. वैद्यकीय तपासणीत त्यांच्याही रक्तात मद्य आढळले.(Pune CopScandal)

दोघांचे हे कृत्य महाराष्ट्र नागरी सेवेचे वर्तणूक नियमांचे उल्लंघन (Police Discipline )करणारे आहे. (Cop Discipline)त्यानुसार शासकीय सेवेतून निलंबन करण्यात आले असून, पुणे पोलिस दलात अनुशासन राखण्यासाठी ही कारवाई आवश्यक होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *