पुणे -प्रतिनीधी
कुंजीरवाडी (ता. हवेली)(Kunjirwadi Attack) येथे कामाच्या पैशांच्या किरकोळ वादातून १९ वर्षीय तरुणावर चार जणांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून दगडाने डोक्यावर मारहाण केली , . या जीवघेण्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(LoniKalbhorCrime)
फिर्यादी आदेश अंकुश सोनवणे (१९, रा. शेवाळेवाडी फाटा, मांजरी बुद्रुक) यांच्या वडिलांकडे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या सुरज गोपीनाथ घोळवे (३०) याने काही महिन्यांपूर्वीचे पैसे मागताना (MoneyDisputeAssault) फोनवर शिवीगाळ केली होती. याचा जाब देण्यासाठी आदेश सुरजच्या घरी गेल्या असता, पैसे देण्यास नकार दिल्यावर वाद भडकला. राजू बिटटू घोळवे (३५) याने आदेश यांना मागून पकडले, तर सुरजने पुन्हा शिवीगाळ करत पैशांची मागणी केली.(YouthInjured)
यानंतर सुरजचे वडील गोपीनाथ अजिनाथ घोळवे (५०), आई जनाबाई गोपीनाथ घोळवे (४६) व इतर नातेवाईक जमा होऊन सर्वांनी मिळून आदेश यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सुरजने दगड उचलून आदेश यांच्या डोक्यावर मारला, ज्यामुळे रक्ताळलेल्या जखमांमुळे ते गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर “पुन्हा आमच्या नादी लागलास तर जिवंत सोडणार नाही,” अशी धमकीही देण्यात आली.()PuneCrimeNews
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी अवस्थेत आदेश सोनवणे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार सुरज गोपीनाथ घोळवे, गोपीनाथ अजिनाथ घोळवे, राजू बिटटू घोळवे व जनाबाई गोपीनाथ घोळवे (सर्व रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ११५(१), ११८(१), ३(५), ३५१(२), ३५१(३), ३५२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
