पुणे -प्रतिनिधी
पुण्यातील हडपसर परिसरात संध्याकाळी एका नामांकित हॉस्पिटलसमोर बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ उडाली.(PuneBombScare) स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले असता, पोलिस, बॉम्बशोधक पथक (BDDS) आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.(HadapsarHospitalBomb)
मिळालेल्या माहितीनुसार, ही वस्तू दोन पाईप आणि टायमर असलेली होती. टायमरवर ७.२८ ही वेळ सेट असून, एकूण ६ तासांचा कालावधी ठेवण्यात आला होता. (TimerBombFound) प्राथमिक तपासात हा टायमर बॉम्ब असल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी परिसर रिकामा करून वस्तू ताब्यात घेतली आणि मोकळ्या जागेत नेण्यात आली. ती नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
घटनास्थळी मोठी गर्दी झाली असली तरी पोलिसांनी ताबडतोब नियंत्रण मिळवले.(BDDSAlertPune) ही वस्तू कोणी ठेवली, घातपाताचा उद्देश काय, याचा तपास हडपसर पोलिस करत आहेत. पुण्यात गुन्हे वाढत असताना अशी घटना चिंताजनक असल्याचे स्थानिकांचे मत आहे.
