पुणे -प्रतीनिधी
पुण्याच्या हडपसर परिसरातील उषाकिरण रुग्णालयाच्या आवारात टायमर बॉम्बसदृश्य वस्तू मोठी खळबळ उडाली होती.(HadapsarBombCase) या घटनेनंतर पुणे पोलसांनी तात्काळ तपास सुरु केला या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती, मात्र संशयित वस्तू सुरक्षितपणे निकामी करण्यात पोलिसांना यश आले होते.(UshakiranHospital )
पण यानंतर ही वस्तू ठेवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु झाला , तर हडपसर मध्ये टायमर बॉम्ब ठेवणारा संशयित शिवाजी राठोड (ShivajiRathodShivajiRathod) याला एटीएसने नागपूरमधून अटक केली आहे.पोलिस, बॉम्ब शोधक व नाशक पथक, एटीएस आणि गुन्हे शाखेने संयुक्त तपास करत १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर संशयिताची ओळख पटली आणि तो आझाद हिंद एक्स्प्रेसने नागपूरला येणार असल्याची माहिती मिळाली , एटीएसने प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
या प्रकरणाचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. प्राथमिक चौकशीत जुन्या वादातून किंवा वैयक्तिक रागातून हे कृत्य केले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आरोपीने हे कृत्य नेमके का केले, याबाबत चौकशी सुरू आहे.
रुग्णालयात सापडलेली संशयित वस्तू निकामी झाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. सध्या एटीएसकडून पुढील तपास सुरू असून लवकरच या प्रकरणाचा अधिकृत उलगडा होण्याची शक्यता आहे.
