Shocking : आई गावाला गेली अन् इकडं बापाने 15 वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार

पुणे – प्रतीनीधी

पुणे जिल्ह्यातील चाकण (Chakan Atrocity) दावडमळा परिसरात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या स्वतःच्या वडिलांनी जबरदस्तीने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार सोमवारी (३० मार्च) सकाळी उघडकीस आला.(Father Abuse) पीडित मुलीने धाडस दाखवत चाकण उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी बापाला तात्काळ अटक करण्यात आली आहे .(Minor Girl)

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई सकाळी साडेदहा वाजता कामावर निघून गेली होती.(POCSOAct ) घरात एकटे असलेल्या मुलीला बापाने धमकावून बळजबरीने अत्याचार केला. या भीषण प्रकारानंतर मुलीने घाबरूनही पोलिसांकडे जाऊन फिर्याद दिली. चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम (Chakan Police) यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या .(Protector Turned Predator )

आरोपीवर भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला लवकरच कोर्टात हजर केले जाणार आहे.(Girl Child Safety) या घटनेमुळे चाकण परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. रक्षकच भक्षक बनल्याने नात्यातील विश्वास धुळीला मिळाला असून, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे .

पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवला असून वैद्यकीय तपासणीही पूर्ण झाली आहे. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, समाजातील या विकृत्तीचा नायनाट व्हावा यासाठी ग्रामस्थ आणि सामाजिक संघटनांकडून मागणी होत आहे. चाकण पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून पीडितेला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *