Phaltan Doctor Suicide Case :फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण : पाच महिन्यांनंतर PSI येणार कारागृहाबाहेर…पण बदनेपुढे ठेवल्या ३ अटी

पुणे -प्रतिनिधी

फलटण येथील डॉक्टर आत्महत्याप्रकरणात (Phaltan Doctor Suicide) गेल्या पाच महिन्यांपासून अटकेत असलेल्या पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदनेचा (PSI Gopal Badne)(वय ३५, मूळ रा. चांदापूर, ता. परळी, जि. बीड; हल्ली रा. बिरदेवनगर, जाधववाडी, ता. फलटण) कोल्हापूर सर्किट बेंचने ५० हजारांच्या वैयक्तिक बॉण्डवर जामीन मंजूर केला.(Bail Granted) ही घटना २३ ऑक्टोबर २०२५ रोजी घडली होती, जेव्हा एका महिला डॉक्टरने हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली होती.(Phaltan Crime)

मृत्यूपूर्वी डॉक्टरने हातावर PSI गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर (वय २९, रा. लक्ष्मीनगर, फलटण) यांची नावे लिहून शारीरिक-मानसिक छळाचा उल्लेख केला होता.(Maharashtra News) फलटण पोलिसांनी दोघांनाही अटक केली होती. बदनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडे जामिनासाठी अर्ज दाखल केला. सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने जामीन मंजूर केला.(Justice For Doctor )

न्यायालयाच्या तीन अटी:

फिर्यादी साक्षीदारांवर दबाव टाकणार नाही किंवा पुराव्यात फेरफार करणार नाही.

सत्र न्यायालयाची सूट नसल्यास प्रत्येक सुनावणीस हजर राहील; तपास अधिकाऱ्याकडे आधार, पॅन, पत्ता, फोन नंबर व दोन नातेवाईकांची माहिती सादर करावी.

अटी भंग केल्यास जामीन रद्द होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *