Pimpri Chinchwad : पत्नीनं बॉयफ्रेंड ला घरी बोलावलं …. अन् पतीला दारू पाजली… मग बॉयफ्रेंड सोबत मिळून असं काही केलं …की वाचून थक्क व्हाल

भोसरी – प्रतिनिधी

पुण्यातील भोसरी(Bhosari Assault)परिसरात वैवाहिक वादाने अत्यंत धक्कादायक वळण घेतल्याची घटना समोर आली आहे. एका २८ वर्षीय महिनेने प्रियकराच्या मदतीने पतीला सापळ्यात ओढून लाकडी दांडकी व रबरी पाईपने अमानुष मारहाण केल्याचा गंभीर आरोप आहे.(Wife Lover Attack ) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवताना पीडिताने सांगितले की, पत्नीने हल्ल्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले.(Marital Dispute)
मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीने पतीला भोसरी येथे बोलावले. तिच्या प्रियकराने त्याला घरात नेले व जबरदस्तीने दारू पाजून नशेत आणले.

नंतर प्रियकराने लाकडी दांडक्याने चेहऱ्यावर,(Amol Dhavale) मानेवर व पाठीवर बेदम मारहाण केली. पत्नीने घराचा दरवाजा आतून बंद ठेवून पळण्यापासून रोखले व संपूर्ण प्रकार मोबाइलमध्ये चित्रित केल्याचा आरोप पीडिताने केला आहे.या प्रकरणात पत्नी व प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, भोसरी पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. घटनेचे नेमके कारण, वैवाहिक वादाची पार्श्वभूमी व इतर संशयित पैलूंचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, सीसीटीव्ही फुटेज व साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत.

या घटनेमुळे भोसरी परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वैवाहिक कलहाला हिंसक रूप देणाऱ्या अशा कृत्यांवर कठोर कारवाई व्हावी, आरोपींना शुद्ध शासन व्हावे याची मागणी जोर धरली आहे. अलीकडच्या काळात पुणे शहरात वैवाहिक वादांना हिंसेत रूपांतरित होण्याच्या घटना वाढत असल्याने समाजात चिंतेचे वातावरण आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीडिताची वैद्यकीय तपासणी करून जखमांचा अहवाल घेतला जाईल. आरोपींचा शोध घेत असून लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास अहमदनगर विभागाचे पोलीस उपनिरीक्षक करीत असून, कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीचे आश्वासन देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *