Hadpsar : नाव ‘स्पा सेंटर’ पण आत सुरु होता वेगळाच कारभार, हडपसरमधील त्या स्पा वर पोलिसांची धाड … पाच तरुणीची सुटका

पुणे- प्रतिनिधी

हडपसर परिसरातील ‘एस.पी. बॉडी फिटनेस’ स्पा सेंटरवर मसाजच्या नावाखाली चाललेल्या देहव्यापार रॅकेटचा गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (AHTC) पर्दाफाश केला. (HadapsarSpaRaid) शुक्रवारी (८ मे) सायंकाळी धडक कारवाईत पाच पीडित तरुणींची सुटका करण्यात आली असून व्यवस्थापिका आशा मुकेश गोरे (५५, रा. हांडेवाडी) यांना ताब्यात घेण्यात आले.(SPBodyFitness )

पोलिसांच्या माहितीनुसार, गाडीतळ परिसरातील वैभव थिएटर शेजारील या स्पावर आशा गोरे (AshaGore ) पैशांचे आमिष दाखवून महिलांना देहव्यापारात ढकलत असल्याचे उघड झाले.(SexRacket) तपासात स्पाच्या नावाने वेश्याव्यवसाय चालवून मिळणाऱ्या कमाईतून तिची उपजीविका भागत असल्याचे निष्पन्न झाले.(AHTCBust)

हडपसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १४३(१)(३) आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी ताब्यात असून रॅकेटमागील इतरांना शोधण्यात पोलिस गुंतले आहेत.(Gadital )

या कारवाईमुळे हडपसरमध्ये खळबळ उडाली असून स्पा सेंटरच्या नावाने चालणाऱ्या बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.(HadapsarPolice)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *