Pune Crime : रिल्स स्टार महिला पोलीस बनल्या ब्लॅकमेलर , प्राचार्याकडून लाखोंची उकळली खंडणी … PSI सह तिघांवर गुन्हा दाखल …

पुणे -प्रतिनिधी

आरटीओ कार्यालयाजवळील नामांकित महाविद्यालयाच्या ५५ वर्षीय प्राचार्यांवर पोस्को गुन्हा (POCSO Extortion) दाखल करून अटक आणि बदनामीची भीती दाखवत ७ लाखांची खंडणी उकळणाऱ्या रिल्स स्टार महिला अंमलदार सोनाली गुलाबराव हिंगे (Sonali Hinge)(३५), पीएसआय अजित त्रंबक बडे(PSI Ajit Bade ) (३८) आणि अंमलदार सुदाम बाळकृष्ण तायडे (३५) यांच्यावर बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.(Pune Corruption) १८ ते २८ जुलै २०२५ या कालावधीत घडलेल्या या घोटाळ्याने पुणे पोलिस दल हादरले असून, आयुक्तांनी थेट तपासाचे आदेश दिले आहेत.(Police Scam)

प्राचार्यांवर त्यांच्या महाविद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून पोस्को गुन्हा दाखल झाला होता.(Reels StarCop) याचा फायदा घेऊन सोनाली (रिल्स स्टार म्हणून प्रसिद्ध) व सहकाऱ्यांनी “अटक टाळा, (Extortion Scam) संस्थेची बदनामी होणार नाही” असा खोटा दावा करत ७ लाख मागितले आणि उकळले. (Pune Police Crime )प्रकरण आयुक्तांकडे गेल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला.(Principal Blackmail )

नुकतेच वाघोलीतील तीन पोलिस कपलकडून खंडणी घोटाळा उघडला असताना हा प्रकार समोर आल्याने पुणे पोलिस दलाची प्रतिमा डागाळली जात आहे. (BundGarden Police)बंडगार्डन पोलिस तपास करीत असून, आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.(POCSO Extortion) प्राचार्यांच्या तक्रारीवरून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा व इतर कलमानुसार गुन्हा दाखल झाला असून, पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.(Pune Corruption)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *