Pune : विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या ; नातेवाईकांकडून घातपाताचा संशय … लोणी काळभोर मधील घटना
पुणे – प्रतिनिधी लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा (Malimala) परिसरात एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.(Lonikand Police) ही घटना शुक्रवारी (ता. ६) सकाळच्या सुमारास उघडकीस आली असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव प्रियांका लक्ष्मण वाघमारे (वय २४) असे असून, तिच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी संशय व्यक्त केला…
