पुणे – प्रतिनिधी
राज्यभरात गुन्हेगारींच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना , खराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे . एका पतीने पत्नी झोपेत असतानाच तिच्या जवळ गेला अन धारदार शस्त्राने वार केले गळा नाक कापून तिची निर्घूण हत्या केली .आणि घटनेनंतर आरोपी पती घरातून फरार झाला . या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे .(Pune Crime)
खून झालेल्या महिलेचे नाव किरण दयाराम बाबर (Kiran Babar) (वय ३२, रा. भनगाई वस्ती, खराडी) असे आहे .याप्रकरणी पती दयाराम तोताराम बाबर (वय ३६) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत किरण हिचा भाऊ दादू सजन बोरसे (Daya Ram Babar) (वय २३, रा. भनगाई वस्ती, खराडी) यांनी खराडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी पती हा खासगी ठिकाणी सफाई कामगार म्हणून काम करतो. त्याची पत्नी किरण खराडी परिसरात घरकामे करते. बाबर दाम्पत्याला एक मुलगा आणि मुलगी आहे. आरोपीला दारू पिण्याचे व्यसन आहे. गेल्या काही दिवसांपासून बाबर दाम्पत्यात वाद होत होते. बुधवारी (२४ जून) पहाटे चारच्या सुमारास किरण गाढ झोपेत होती. शेजारी मुले झोपली होती. आरोपीने तिच्या गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. आरोपीने किरणचे नाक आणि कान तीक्ष्ण शस्त्राने कापला. गंभीर जखमी झालेल्या किरणला भाऊ दादू याने रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टारांनी सांगितले.
आरोपी पती हत्येनंतर फरार…
बुधवारी पहाटे चारच्या सुमारास पत्नी किरण आणि तिची मुले गाढ झोपेत होती. याच वेळी दारूच्या नशेत असलेल्या दयारामने घरात असलेल्यागळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून केला , घटनेची माहिती मिळताच खराडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.(Police Investigation)
