Pune Traffiic Police : दंडात्मक कारवाईऐवजी पैसे उकळणारे , पुण्यातील ते दोन वाहतूक पोलिस निलंबित ; वाचा सविस्तर

पुणे : प्रतिनिधी

वाहतूक नियमनाच्या नावाखाली वाहनचालकांकडून खंडणी उकळणाऱ्या सहकारनगर वाहतूक विभागातील दोन पोलिस हवालदारांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.(Traffic CopS uspended) वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओची दखल घेतली असून, पुणे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

१९ एप्रिलला शारदा आर्केड चौकातील प्रकार (Sharda Arcade)
हवालदार अंकुश रामा पवार (Ankush Pawar) आणि अंमलदार लक्ष्मण बालाजी रामगडे (Laxman Ramgade) यांची शारदा आर्केड चौकात सिग्नल तोडणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाईसाठी नियुक्ती होती. रस्त्याच्या कडेला थांबवून कारवाई करताना एका वाहनचालकाने त्यांचे चित्रीकरण केले. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जबाब नोंदवले.(Extortion Scandal )

खंडणीचा ठपका
चौकशीत पवार व रामगडे यांनी एका वाहनचालकाकडून १५० रुपये, दुसऱ्याकडून १५० रुपये आणि तिसऱ्याकडून २०० रुपये ऑनलाइन घेतल्याचे निष्पन्न झाले. ही रक्कम अधिकृत दंडाऐवजी थेट स्वीकारली असल्याचा आरोप आहे. कर्तव्यावर बेशिस्त वर्तन केल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली.(SahakarnagarTraffic)

वाहतूक नियमनाचे निर्देश
शहरात वाहतूक पोलिस चौकात उभे राहून नियमन करण्याऐवजी रस्त्याच्या कडेला घोळक्याने कारवाई करतात. पोलिस आयुक्तांनी यापूर्वी चौकात उभे राहून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे आदेश दिले असून, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी सूचना आहे. तरीही काही ठिकाणी ही पद्धत सुरू असल्याचे समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *