पुणे -प्रतिनिधी
‘बाप का, भाई का बदला लेगा रे तेरा फैजल’ गँग ऑफ वासेपूर नावाच्या सिनेमातला डायलॉग चांगलाच गाजला होता. आता या सिनेमासारखीच एक घटना पुणे ग्रामीण मधील राजगड पोलीस ठाण्याच्या (Rajgad Murder) हद्दीत घडली आहे .वडिलांचा खून करणाऱ्या मारेकऱ्याची एखाद्या सिनेमाला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. जेलमधून जामिनावर बाहेर आलेल्या मारेकऱ्याचा मुलाने खून केला आहे तब्बल सपासप २८ वार करून वडिलांच्या हत्येचा बदला (Revenge For Father) घेतला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, णे-सातारा महामार्गावरील जुन्या कात्रज बोगद्याजवळ शिंदेवाडी परिसरात संजय देशमुख (Pune Crime News)यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात (Pune Crime News) आली .मृताचे नाव संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०, रा. मुंढवा, मूळ रा. कुरण, ता. वेल्हे) असे आहे.असं हत्या करण्यात आलेले व्यक्तीच नाव आहे. तर अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मंथन दिनेश वैद्य, सौरभ सागर परदेशी, मिझान गौसउद्दीन शेख, संदीप बाबुलाल कोरी अशी आहेत.(Pune Crime)
23 वर्षापूर्वी वडीलांची केली होती हत्या …
२०२३ मध्ये मृतक संजय देशमुख याने (sanjay Deshmukh ) आरोपी मंथन वैद्य (Manthan Vaidya) हा दीड वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचा विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून केला होता .. त्या हत्येच्या प्रकरणात संजय देशमुख हा मुख्य आरोपी होता आणि तो साडेतीन वर्षे जेलमध्ये राहिला होता. त्यानंतर तो जामिनावर सुटला होता.(Old Wounds)
आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याचा चंग बांधला. काही वर्ष त्याने संजयवर पाळत ठेवली. त्यानंतर संधी साधून मृतक संजयवर पुणे-सातारा महामार्गावरील जुन्या कात्रज बोगद्याजवळील शिंदेवाडी परिसरात धारदार शस्त्राने २८ सपासप वार केले. मान, हात, पाय आणि पोटाला झालेल्या गंभीर जखमांमुळे संजय चा जागीच मृत्यू झाला.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि राजगड पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला. तपासादरम्यान मंथन वैद्य आणि सौरभ परदेशी यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी मिझान शेख आणि संदीप कोरी यांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. तपासात आरोपींकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. पोलिसांच्या तपासानुसार, मंथन वैद्यच्या वडिलांचा खून संजय देशमुख यांनी केला होता. वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मंथनने साथीदारांच्या मदतीने संजय देशमुख यांची हत्या केल्याची कबुली दिली.पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत .
