Pune Crime : पुण्यात विषारी दारूमुळे 18 जणांचा मृत्यू, पोलीसच निघाले ‘मौत के सौदागर’? ते कनेक्शन उघड , 4 जणांचं निलंबन

पुणे -प्रतिनिधी

पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड परिसरात हातभट्टीच्या विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंनंतर आता या प्रकरणाचे पडसाद पुणे ग्रामीण पोलिस दलात उमटू लागले आहेत. (PoisonLiquorCase) आतापर्यंत एकूण १८ जणांचा बळी गेल्याची माहिती असून, (18Deaths) अनेकजण रुग्णालयात जीव वाचवण्यासाठी झुंज देत आहेत.(PunePCMC) मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात असताना, पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करणारा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी राधेश्याम प्रजापती याच्याशी पुणे ग्रामीण पोलिस दलातील काही कर्मचाऱ्यांचे थेट संपर्क असल्याची माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे.(PuneRuralPolice) या पार्श्वभूमीवर कठोर पाऊल उचलत पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी चार पोलिस कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित केले आहे.(CopsSuspended) निलंबितांमध्ये दौंड पोलिस उपअधीक्षक कार्यालयातील सुभाष डोईफोडे, उरुळी कांचन पोलिस ठाण्यातील हवालदार अजित शिवाजी काळे (AjitShivajiKale) व पोलीस शिपाई सुमित नंदकुमार वाघ (SumitNandkumarWagh), तसेच यवत पोलिस (YavatPoliceStation) ठाण्यातील हवालदार रामदास ज्ञानदेव जगताप (RamdasJnandevJagtap) यांचा समावेश आहे.(LiquorMafiaNexus)

राधेश्याम प्रजापती हा उरुळी कांचन परिसरातील रहिवासी असून, त्याचे या चौघांशी संपर्क असल्याचे तपासात निष्पन्न झाले. अपर पोलिस अधीक्षक (बारामती विभाग) (Sandipsinhgil)यांच्या चौकशीत संबंधित कर्मचाऱ्यांचे वर्तन पोलिस दलाच्या शिस्तीला बाधक आणि अत्यंत संशयास्पद असल्याचे नमूद करण्यात आले. या अहवालाच्या आधारे महाराष्ट्र पोलिस अधिनियम व संबंधित नियमांनुसार चौघांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करत त्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.(PoliceDisciplinaryAction)

साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याची शक्यता लक्षात घेऊन निलंबन काळात या सर्व कर्मचाऱ्यांचे मुख्यालय पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालय निश्चित करण्यात आले आहे. वरिष्ठांची पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, तसेच सकाळ आणि संध्याकाळ अशा दिवसातून दोन वेळा मुख्यालयात हजेरी लावणे त्यांच्यासाठी अनिवार्य करण्यात आले आहे.

या कारवाईमुळे विषारी दारू प्रकरणातील चौकशीची व्याप्ती आणखी वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अवैध दारू व्यवसायाला संरक्षण देणाऱ्या घटकांविरुद्ध पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे मानले जात असून, आगामी काळात या प्रकरणात आणखी काही धक्कादायक तपशील उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *