पुणे -प्रतीनीधी
खडक पोलीस स्टेशन च्या हद्दीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे , प्रियसीच्या त्रासाला कंटाळून
प्रेमसंबंधातून सतत होणारा मानसिक त्रास सहन न झाल्याने २४ वर्षीय गणेश अशोक हलवाई यांनी घोरपडे पेठेतील त्यांच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.(GhorpadePeth) या घटनेबाबत त्याच्या बहिणीने एका महिलेविरुद्ध आत्महत्येकडे प्रवृत्त केल्याचा आरोप करत खडक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.(Suicide)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश आणि ३२ वर्षीय स्वप्नाली संतोष तावरे यांच्यात प्रेमसंबंध होते. (MentalHarassment) नातेवाइकांच्या हस्तक्षेपानंतर दोघांनी पुढील काळात एकमेकांशी संबंध न ठेवण्याचा निर्णय घेतला होता. (LoveAffair) परंतु त्यानंतर स्वप्नालीने गणेशला सतत त्रास देण्यास सुरुवात केली आणि त्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्यासह खोट्या बलात्काराच्या आरोपांनी त्रास देण्याचा दाखवणीचा दबाव दिला, अशी तक्रारीत नोंद आहे.(PoliceInvestigation)
वारंवार होणारा मानसिक त्रास सहन न झाल्याने गणेशने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.(JusticeNeeded) या प्रकरणी त्याच्या बहिणी कोमल नीलेश सोनवणे यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी स्वप्नाली तावरे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. उपनिरीक्षक ताळीकोटे हे प्रकरण तपास करीत आहेत.
