पुणे – प्रतिनिधी
महिलेसोबत अनैतिक संबध असल्याच्या संशयातून एका ५४ वर्षीय व्यक्तीची रॉडने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना तरंगवाडी (इंदापूर )(Tarangwadi Incident) शनिवारी २० जून रोजी दुपारी घडली आहे . याप्रकरणी पोलिसांनी काही तासातच आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत .(Indapur Police)
छगन पांडुरंग भिसे (Chhagan Bhise)(वय 54) असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. धुळदेव उर्फ देवा तुकाराम माने (Dhuldhev Deva Mane) आणि अशोक भानुदास टकले (Ashok Takle) असं आरोपीचं नाव आहे. या हत्येप्रकरणी इंदापूर पोलिसांनी धुळदेव माने आणि अशोक टकले यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार शनिवारी दुपारी तरंगवाडी गावातील (Tarangwadi Incident) वाघजाई चौकात अनैतिक संबंधांच्या जुन्या भांडणातून छगन भिसे यांच्याशी वाद सुरू झाले. वाद इतका वाढला की आरोपींनी संगनमत करून छगन भिसे यांना घेरून ठेवले आणि जवळची लोखंडी रॉड वापरून त्यांच्या डोक्यावर व शरीरावर वार केले. या भीषण हल्ल्यात छगन भिसे यांचा जागीच मृत्यू झाला.(Waghjai Chowk)
घटनेची धाकदायक माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड (Dr Sudarshan Rathod) घटनास्थळी दाखल झाले आणि तपासाचे आदेश दिले. इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास नाळे (Vilas Nale)यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके पाठवण्यात आली आणि पसार आरोपींचा शोध सुरू केला गेला.
तात्काळ तांत्रिक चौकशी आणि स्थानिक तपासातून पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील रहिवासी धुळदेव उर्फ देवा तुकाराम माने याला काही तासांत अटक केली. (Murder In Village)पोलिसांनी सांगितले की, धुळदेव हा या घटनेतील मुख्य आरोपी आहे आणि त्याच्याविरुद्ध पुरावे जमा केले गेले आहेत. दुसरा आरोपी अशोक टकले याचा शोध अद्याप सुरू आहे आणि त्याला पकडण्यासाठी पोलिसांचा कसून तपास सुरु आहे .
