Pune Crime : बुलेट मोटरसायकल चोरीचे आरोपी अटक ; बारामती पोलिसांची कामगिरी

पुणे – प्रतिनिधी

चोरीची दुचाकी विक्रीतून पाच- दहा हजार मिळतात. पण बुलेट विकली तर ४० ते ५० हजार मिळतात, म्हणून बुलेट चोरी करण्यात हातखंडा झालेल्या बुलेटचोरांच्या बारामती तालुका पोलिसांनी सापळा रचून आरोपीच्मुया सक्या आवळल्या आहे .(Bullet Theft)त्याच्याकडून पोलिसांनी रॉयल एनफिल्ड मोटरसायकल जप्त केली आहेत.(Baramati Police)

समीर विलास लोंढे (Sameer Londhe) वय 20, राहणार — मलठण, तालुका दौंड , मयूर विकास बनकर(Mayur Bankar) वय 20, राहणार — विठ्ठल मंदिराजवळ, श्रीरामनगर, बारामती )असे आरोपीचे नावे आहेत .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरीच्या दाखल गुन्ह्य्चा तपास करत असताना गुप्त बातमीदार मार्फत सदर गुन्हेतील बुलेट गाडी ही अर्पित नामे समीर विलास लोंढे याने त्याचे साथीदारसह चोरी केली असून ते दोघे भिगवन रोडवरील वनविभागाचे बसले ची माहिती पथकातील पोलीस अंमलदार यांना मिळाली ,सदरील बातमीची खात्री करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला सापळा रचून अटक केली .

पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण संदीप गिल(Sandeep Gil) मा.अपर पोलीस अधीक्षक बारामती, गणेश बिरादार (Ganesh Biradar) मा. उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती, सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक, बारामती तालुका पोलीस ठाणे नारायण पवार (Narayan Pawar) यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली ग्रेड पो उप नी/ कल्याण शिंगाडे, सफौ/सुरेंद्र वाघ, पोहवा/ रामदास जाधव , पोहवा/एकसिंगे, पो हवा/ ढवान , म पो हवा/ रचना काळे, मपोहवा / भारती खंडागळे, पोशि/निलेश वाकळे यांनी सदरची कामगिरी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *