Pune Acid Attack : तू माझी नाही नाहीस तर कोणाचीच होऊ देणार नाही …पुण्यात लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या तरुणीवर भररस्त्यात ॲसिड हल्ला

पुणे -प्रतिनिधी

प्रेम संबधाला नकार दिल्याने पुण्यात तरुणीवर व तिच्या मित्रावर ॲसिड हल्ला (AcidAttack) केल्याची धक्कदायक माहिती समोर येत आहे .याप्रकरणी गुन्हे शाखेने २० तासात आरोपीला कनार्टकमधून बेड्या ठोकल्या आहेत .आरोपीचे नाव श्रीराम मधु सरुनवर (वय २०, रा.तोणवाला बैतुल,जि. अमला मद्यप्रदेश) असे आहे ,(CrimeAgainstWomen) याप्रकरणी २१ वर्षीयतरुणीने बंडगार्डन पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरून आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे (LoveAffairRevenge)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणी आणि आरोपी श्रीराम हे नातेवाईक असून ते मुळचे मध्यप्रदेशातील आहेत. (PuneCrime) दोघांत काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. २०२५ मध्ये झालेल्या वादानंतर तरुणीने त्याच्यापासून पूर्ण वेगळे होण्याचा निर्णय घेतला.(LiveInRelationship) त्यानंतरही श्रीराम तिचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून तिने मध्यप्रदेशात त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता. त्यामुळे तो तिच्यावर चिडून होता.(BhopalToPune)

दरम्यान, २०२५ मध्ये भोपाळमध्ये काम करत असताना तरुणीची आदर्श पांडे याच्याशी ओळख झाली.(PoliceAction) ही ओळख पुढे मैत्रीत रुपांतरित झाली. त्यानंतर २०२६ मध्ये तरुणी आणि आदर्श कामानिमित्त पुण्यात आले. ताडीवाला रोड परिसरात लिव्ह-इनमध्ये राहून दोघे एका बारमध्ये काम करत होते. श्रीरामला त्यांच्या नात्याबद्दल समजताच तो अधिक चिडला. तो तरुणीला फोन करून “तु माझी नाहीस तर कोणाचीच नाहीस” अशा धमक्या देत राहिला.(AccusedArrested )

बुधवारी मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास बारमधील काम आटोपून दोघे पायी घरी जात असताना जनता विद्यालयाजवळ श्रीरामने त्यांचा पाठलाग करून त्यांना गाठले. त्याने अचानक तरुणीच्या अंगावर ॲसिड फेकले. (HubballiArrest )आदर्शने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्यावरही ॲसिड फेकण्यात आले. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी होऊन कोसळली, तर आदर्शही भाजला. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांच्या मदतीने दोघांना ससून रुग्णालयात दाखल केले. हल्ल्यानंतर श्रीराम तेथून पसार झाला.(CrimeNews)

घटनानंतर गुन्हे शाखेने श्रीरामचा शोध सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर तो रेल्वे स्थानकावरून चालुक्य एक्सप्रेसने प्रवास करताना दिसला. पोलिसांना चकवा देण्यासाठी त्याने तीन वेळा पेहराव बदलल्याचेही तपासात समोर आले. दरम्यान, खंडणीविरोधी पथकातील कर्मचारी सुरेंद्र जगदाळे, कानिफनाथ कारखेले आणि तानाजी देशमुख यांना तो कर्नाटकातील हुबळी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने हुबळी येथे सापळा रचून श्रीरामला बेड्या ठोकल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *