Pune Crime : कचऱ्याच्या बादलीवरून सख्ख्या भावांमध्ये हाणामारी ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : प्रतिनिधी

उरुळी कांचन परिसरात किरकोळ कारणावरून सख्ख्या भावंडांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत होऊन एक जण जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.(Uruli Kanchan PoliceStation) पायऱ्यांवर ठेवलेली कचऱ्याची बादली बाजूला काढण्यावरून सुरू झालेल्या वादात भावाने क्रिकेटच्या बॅटने तर भावजयीने हाताने मारहाण केल्याचा आरोप आहे.

ही घटना बुधवारी (२७ मे) सकाळी साडेनऊच्या सुमारास उरुळी कांचन (ता. हवेली) येथील सदानंद बेकरीच्या पाठीमागे घडली. याप्रकरणी सुनील संदीपान गाढवे (Sunil Sandipan Gadhave)(वय ३८, व्यवसाय किराणा दुकान, रा. सदानंद बेकरी पाठीमागे, डाळिंब रोड, उरुळी कांचन) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून भाऊ अनिल संदीपान गाढवे आणि भावजयी शुभांगी अनिल गाढवे (Shubhangi Anil Gadhave) (दोन्ही रा. सदानंद बेकरी पाठीमागे, डाळिंब रोड, उरुळी कांचन) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, सुनील हे सकाळी घराकडे जात असताना पायऱ्यांवर कचऱ्याची बादली ठेवलेली दिसली. त्यामुळे त्यांनी सख्ख्या भावाला “ही बादली बाजूला काढ” असे सांगितले. यावरून अनिलची पत्नी शुभांगी घरातून बाहेर आली आणि शिवीगाळ करत सुनील यांना हाताने मारहाण करून ढकलून दिले. तेवढ्यात अनिल गाढवे हा क्रिकेटची लाकडी बॅट घेऊन धावत आला आणि कोणतीही शहानिशा न करता सुनील यांच्या कानामागे, डोक्यावर, उजव्या हाताच्या दंडावर, कोपराजवळ आणि पायाच्या पोटरीवर बॅटने वार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.(Minor Issue BigFight)

वाद वाढत असल्याचे पाहून सुनील यांची पत्नी भांडण सोडवण्यासाठी पुढे आली. मात्र, अनिल आणि शुभांगी यांनी तिच्यावरही धावून जात जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकारानंतर सुनील गाढवे यांनी मंगळवारी (२ जून) उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पती-पत्नीविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार कमलेश होले (Police Constable Kamlesh Hole) करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *