Pune News : सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीने रोखली बंदूक, पोलिसांकडून प्रत्युत्तर, पुणे हादरलं!

पुणे -प्रतिनिधी

पुणे शहरात पोलीस आणि आरोपीमध्ये पहाटेच्या सुमारास एक थरारक प्रकार घडलाय. ज्यात आरोपीला पकडण्यासाठी पोलीस गेले असता तेव्हा गुन्हेगाराने चक्क पोलिसांवर रिवाल्वर रोखलीय.(Self Defence)या अनपेक्षित हल्ल्यामुळे पोलिसांनी अत्यंत धाडसाने स्वतःचा जीव वाचवत स्वसंरक्षणार्थ आरोपीवर प्रतिगोळीबार केला. (Police Firing) वानवडीतील रामटेकडी भागात हा थरार घडला.

सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश रायकर (Officer Ganesh Raykar) असे या धाडसी अधिकाऱ्याचे नाव आहे. या गोळीबारात सराईत गुन्हेगार करणं सिंग (Accused Karan Singh) हा जखमी झाला आहे. त्याच्या पायाला गोळी लागली असून, ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांवर आरोपीने तानली बंदूक, पोलिसांचाही गोळीबार

मिळालेल्या माहितीनुसार, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आणि पोलिसांना हवा असलेला करण सिंग हा वानवडीतील शहरातील रामटेकडी परिसरात आहे, अशी माहिती पुणे पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे बाणेर पोलिसांचे पथक रामटेकडी परिसरात पोहोचले. तेव्हा सराईत गुन्हेगार करण सिंग याला पोलीस आल्याची त्याला कुणकुण लागली . (Police Action)पहाटेच्या अंधारात आरोपी घटनास्थळी येताच पोलिसांनी त्याला चहूबाजूंनी घेरले आणि पकडण्यासाठी झेप घेतली. मात्र, पोलिसांना पाहताच आरोपीने शरण येण्याऐवजी पोलिसांशीच थेट जीवघेणी झटापट सुरू केली. धक्कादायक बाब म्हणजे, या नराधमाने त्याच्याकडे असलेले अग्निशस्त्र (पिस्तूल) काढून थेट कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. त्याला उत्तर म्हणुन पोलिसांनी फायरिंग केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *