पुणे -प्रतिनिधी
पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणात आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्याविरोधात दररोज नवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. दोघांना वडगाव न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर केले गेले असून, त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत २९ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, केतन अग्रवाल (Ketan Agrawal) याला मारण्यासाठी सिया आणि चेतन यांनी एका व्यक्तीला सुपारी देण्याचा प्रयत्न केला होता. त्या व्यक्तीने सुरुवातीला सुपारी स्वीकारली; मात्र केतन अग्रवाल कोण आहे हे समजताच, त्याने ऐनवेळी मागे हटत हा प्लॅन मोडीत काढल्याचे सांगितले जाते.(Lohgad Case)
पोलिस तपासात सिया गोयल (Siya Goyal) आणि चेतन चौधरी (Chetan Chaudhary) यांच्या वर्तणुकीचे अनेक विचित्र पैलू उघड होत आहेत. दोघे एकटेच नव्हेत तर आणखी काही मित्रांसोबत ते नियमितपणे काही ठराविक हॉटेलमध्ये भेटत असल्याची माहिती मिळाली आहे. (Pune Crime News) संबंधित हॉटेलचे पत्ते आणि तेथे गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासात मिळाले असून, त्यात सिया आणि चेतन एका हॉटेलमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. पुढे त्याच हॉटेलमध्ये चेतन दुसऱ्या मैत्रिणीसोबत जाताना आणि त्याच खोलीत प्रवेश करताना दिसल्याचेही फुटेजमधून स्पष्ट झाले आहे.(Vishal Agrawal Family)
तपासात उघडकीस आलेल्या आणखी एका गंभीर बाबीनुसार सिया गोयल आणि चेतन चौधरी हे केवळ साधे मित्र नव्हते, तर ते दोघं मिळून एक कथित “फ्री सेक्स ग्रुप” चालवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हा ग्रुप काही निवडक मित्रांच्या नेटवर्कभोवती फिरत होता आणि पुणे परिसरातील ४–५ नामांकित हॉटेल्समध्ये त्यांची नियमित भेट होत असल्याची माहिती तपासात आली आहे.(Hotel Meetups)
सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका हॉटेलमध्ये सिया आणि चेतन एकत्र रूममध्ये जाताना दिसतात; काही वेळानंतर सिया बाहेर पडते आणि त्यानंतर चेतन दुसऱ्याच मैत्रिणीसोबत त्याच रूममध्ये जाताना दिसत असल्याचे तपासात नोंदवले गेले आहे. या फुटेजमुळे हा ग्रुप फक्त ऑनलाईन चॅटपुरता न राहता प्रत्यक्ष भेटी आणि शारीरिक संबंधांपर्यंत पोहोचलेला होता, हे सूचित होते.(Murder Conspiracy)
