पुणे -प्रतिनिधी
प्रत्येकाच्या घरात भांड्याला भांडं हे लागतं पण सर्वात जास्त नात्यावर चर्चा होती ती म्हणजे सासू – सुनेच्या. सासू – सून वाद हा वर्षानुवर्ष आणि परंपरागत चालू आहे. अनेक घरांमध्ये आजही एकत्र राहताना सासू आणि सुनेमध्ये वाद विकोपाला गेल्याने मोठा अनर्थ झाल्याच्या घडल्या आहे. (Pune Crime News )आता पुण्यातील मुंढवा परिसरातून एक अत्यंत धक्कदायक आणि अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे .(Mundhwa)
मुलाला डोळ्यात तिखट टाकून मारहाण केल्याचा जाब विचारायला गेलेल्या ६० वर्षीय सासूला तिच्याच सूनेन तिच्या काही नातेवाईकांच्या मदतीने चाकूने सपासप वार केल्याची घटना उघडकीस आली आहे .
या प्रकरणी सून रूपाली मनोज धोत्रे (Rupali Dhotre), व वैजयंता अनिल जाधव (Vaijayanta Jadhav) आणि पूजा विजय जाधव (Pooja Jadhav) या तिघींविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सून रूपाली मनोज धोत्रे हिने सुरुवातीला आपल्या पतीसोबत वाद घातला आणि त्याला बेदम मारहाण करत त्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. पतीवर झालेल्या या अन्यायाची माहिती मिळताच, पीडित तरुणाची ६० वर्षीय वृद्ध आई बीडहून तातडीने पुण्यात दाखल झाली. (Knife Attack)मुलासोबत नेमके काय घडले, हे जाणून घेण्यासाठी त्या सुनेच्या घरी गेल्या. मात्र, जाब विचारण्यासाठी आल्याचं सुनेला अजिबात आवडले नाही.
हे हि वाचा :
मोठी अधिकारी ; पण पैशांसामोर झुकली , दिघीमधील पोलिसाचं नको ते कांड , शेवटी रांगेहात पकडलं
तरुणाची ६० वर्षीय वृद्ध आई सुनेच्या घरी पोहचताच सून आणि तिच्या दोन महिला साथीदारांनी वृद्ध सासूला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी सासूला लाथाबुक्क्यांनी बेदम मारले आणि वाद इतका टोकाला गेला की, सुनेने घरातून एक धारदार चाकू आणला. या चाकूने तिनेवृद्ध सासूच्या हातावर सपासप वार केले. सासू रक्ताच्या थारोळ्यात पडली असतानाही या महिलांचा क्रूरपणा थांबला नाही, त्यांनी त्यांना मारहाण करणे सुरूच ठेवले. भरदुपारी भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून जखमी ६० वर्षीय वृद्ध महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .(Chilli Powder Assault)
