पुणे -प्रतिनिधी
पुणे , हडपसर , चिंचवड परिसरात घडलेल्या विषारी फुगेवाडी दारूकांड (Phugewadi)प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला बाळू लोंढे याला पुणे ग्रामीण च्या पोलिसानी ऊरुळी कांचन मध्ये सिने स्टाइल पाठलग करून गजाआड केले . (Pune)
दत्ता उर्फ बाळू लोंढे असं फरार आरोपीचे नाव असून गाडीची नंबर प्लेट बदलून, वेष बदलून हा आरोपी वावरत होता.पुणे ग्रामीण पोलिसांनी या आरोपीला राजेवाडीतून ताब्यात घेतलाय.हा आरोपी गेल्या 4 महिन्यांपासून फरारी होता.लोंढे यांने संपूर्ण अवैध दारू निर्मिती आणि वितरणाचा सिंडिकेट चालवला होता.योगेश वानखेडे आणि इतर आरोपी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते. पुणे ग्रामीण पोलिसांनी काही वेळापूर्वी ताब्यात घेतल असून, पंचनामा व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या आरोपीला सीआयडीच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती.
सीआयडीचे प्रमुख सुनील रामानंद यांनी याबाबत माहिती दिली. दत्ता ऊर्फ बाळू लोंढे (Balu Londhe) हा या प्रकरणातील मुख्य संशयित असून, गुन्हे दाखल झाल्यापासून तो फरार होता. पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने त्याचा शोध घेऊन त्याला पकडले आणि सीआयडीच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आल्याचे रामानंद यांनी सांगितले.(Pune Rural Police)
या प्रकरणात सीआयडीने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लागू केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींसह अद्याप फरार असलेल्या आरोपींवरही मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
