पुणे – राजगुरुनगर
पोलीस वारंट
शहरातील वाडा रोड परिसरातील संगम गार्डन येथे कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.(Pune rime)
एवढ्यावरच न थांबता आईला वाचविण्यासाठी धावून आलेल्या १७ वर्षीय मुलाचा ओढणीने गळा आवळण्याचा प्रयत्न केले. (Pune News) तसेच त्याच्यावर चाकूने वार करून खुनाचा प्रयत्न केला. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत दीपा महेंद्र दौंडकर (वय ४०) यांचा मृत्यू झाला असून, त्यांचे पती महेंद्र शिवाजी दौंडकर (वय ४५) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. ३०) सकाळी साडेनऊ ते साडेअकराच्या दरम्यान संगम गार्डन, वाडा रोड येथील त्यांच्या राहत्या घरी घडली. कौटुंबिक कारणातून घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे खेड शहरात खळबळ उडाली आहे.(Pune Murder )
मुलगा अथर्व महेंद्र दौंडकर (वय १७ ) याने दिलेल्या माहितीनुसार, रविवार दि. ३० ऑगस्ट रोजी रात्री ९.३०ते ११.३५ वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरी ही घटना घडली. आरोपी महेंद्र दौंडकर याने पत्नी दिपा या आपल्या बहिणीशी बोलत नसल्याच्या रागातून त्यांचा गळा आवळून खून केला. आईला उठवण्यासाठी मुलगा बेडरूममध्ये गेला असता हा प्रकार उघडकीस आला. त्यावेळी आरोपीने मुलाचाही ओढणीने गळफास देऊन खून करण्याचा प्रयत्न केला. (Pune Investigation ) मुलाने आरडाओरड करत घराबाहेर पळण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने ‘तुला चाकूने भोसकेन’ अशी धमकी देत त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर चाकूने वार केला. या प्रकरणी खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करत आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.
