पुणे – प्रतीनीधी
पोलीस वारंट
शहरात गुन्हेगारीचे सत्र सुरू असताना गुन्हे शाखा युनिट चार च्या पथकाने जबरी चोरी , वाहनचोरी , व मोबाइल चोरी करणाऱ्या दोन फरार आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत . (Pune Police)
अटक केलेल्या आरोपीचे नाव राजु तिमय्या राव उर्फ धोत्रे (वय 51, रा. 170, भाऊपाटील रोड, आदर्शनगर, बोपोडी) व गणेश अशोक रेड्डी (वय 36, रा. 170, भाऊपाटील रोड, आदर्शनगर, बोपोडी) असे आहे .
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार खडकी पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिस अंमलदार अनिकेत भोसले व पोलिस हवालदार जहांगीर पठाण यांच्या त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत दाखल गुन्ह्यातील आरोपीबद्दल माहिती मिळलाई मिळाली , ( Pune Crime) माहितीची खात्री करून वरिष्ठ पोलिस निरीक्षक कांचन जाधव यांच्या मार्गदर्शनखाली पथकाने भक्ती प्लाझा, अर्पा, औंध परिसरातील गेटजवळून अचानक घेराव करून आरोपीना सापळा रचून ताब्यात घेतले .
सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पोलीस सह आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्रीमती तेजस्वी सातपुते, . पोलीस उप आयुक्त गुन्हे गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कांचन जाधव, युनिट-४ यांचे मार्गदर्शनात युनिट ४ कडील पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, सहा. पोलीस फौजदार हरीष मोरे, एकनाथ जोशी, पोलीस हवालदार अनिकेत भोसले, जहांगिर पठाण, अमजद शेख, तुषार खराडे, दत्तात्रय गेंगजे, विठ्ठल वाव्हळ, किशोर दुशिंग, नितीन साबळे, सुभाष आव्हाड, वैभव रणपिसे, शरद झांजरे महीला पोलीस अंमलदार रोहीणी पांढरकर, मयुरी नलावडे यांनी केली आहे.(Pune Investigation)
