पुणे – प्रतिनिधी
दौंड तालुक्यातील नानगांव (Nandurbar)येथे अंगावर काटा आणणारी धक्कादायक घटना घडली . सोमवारी दिनांक ३१ रोजी घरातून अचानक गायप झालेल्या पाच वर्षीय चिमूकलीचा मृतदेह दुसऱ्या दिवशी मंगळवारी गावापासून लांब असलेल्या एका विहिरीत आढळला . आईसोबत झालेल्या वादाचा राग मनात धरून एका व्यक्तीने चिमुकलीला विहिरीत ढकलून दिल्याचा आरोप आहे.(Crime News)
गोरख रामसिंग वसावे (Gorakh vasave) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
<iframe width=”560″ height=”315″ src=”https://www.youtube.com/embed/hLF2wi67GWo?si=mNgoiuuefVQPHiB-&start=3″ title=”YouTube video player” frameborder=”0″ allow=”accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture; web-share” referrerpolicy=”strict-origin-when-cross-origin” allowfullscreen></iframe>
दौंड तालुक्यातील नानगांव गावात आरोपीचे चिमुकलीच्या आईसोबत भांडण झाले होते ,
या वादाचा राग मनात धरून आरोपीने चिमुकलीला विहिरीत ढकलून दिल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता.आईसोबत झालेल्या वादातून चिमुकलीला विहिरीत ढकलल्याच्या धक्कादायक प्रकरणी यवत पोलिसांनी आरोपी गोरख वसावे याला ताब्यात घेतले आहे. चौकशीदरम्यान त्याने हा धक्कादायक खुलासा केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.आरोपीला दौंड न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.(Dound Taluk0
शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कारासाठी मूळ गावी नेले पार्थिवदरम्यान, चिमुकलीच्या पार्थिवाचे बुधवारी शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी सहा वाजता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. कुटुंबीयांनी अंत्यसंस्कारासाठी पार्थिव रुग्णवाहिकेतून नंदुरबार जिल्ह्यातील मूळ गावी नेण्याचा निर्णय घेतला आहे.(Pune Crime )
या घटनेन चिमुकलीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तब्बल चार दिवसांनंतर तिच्यावर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. क्षुल्लक वादाचा राग एका निष्पाप जीवावर काढल्याने या घटनेबाबत परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
