पुणे -प्रतिनिधी
पुणे ग्रामीण पोलिसांनी केतन अग्रवाल खून प्रकरणात ५,०५३ पानांची चार्जशीट दाखल केली आहे. यात ८०–८५ साक्षीदारांचा समावेश असून डिजिटल पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाइल चॅट्सचा सविस्तर उल्लेख आहे.(KetanAgarwal Case)
चार्जशीटनुसार, केतनचा मृत्यू १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर झाला. त्यानंतर सिया किल्ल्यावरच ओरडत राहिली, तर चेतनने कुणाला काही कळू न देता किल्ल्यावरून खाली उतरून बाईक काढली आणि जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगतच्या एका हॉटेलमध्ये जाऊन मिसळ खाल्ली. या हॉटेलच्या सीसीटीव्हीत चेतन स्पष्ट दिसून आला; (Siya Goyal) किल्ल्यापासून ते हॉटेलपर्यंतचा त्याचा चेहरा इतर कुठेच दिसला नव्हता, असे पोलिसांनी नमूद केले.
याच फुटेजमुळे पोलिसांना चेतनवर (Chetan Chaudhary) संशय आला आणि त्याला अटक करण्यात आली. चार्जशीटमध्ये आणखी एक महत्त्वाचा खुलासा म्हणजे सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी डिसेंबर २०२५ मध्ये राजस्थानला प्रवास करताना खाटूश्याम मंदिरात गुप्तपणे लग्न केल्याचा संशय व्यक्त केला आहे.(Lohagad Fort)
पोलिसांना मिळालेल्या एका फोटोत चेतनच्या गळ्यात फुलांचा हार आणि सियाच्या कपाळावर सिंदूर दिसत आहे. हा फोटो आणि मोबाइलमधील चॅटिंगवरून हे लग्न झाल्याचा संशय बळावला आहे.(Crime News)
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी फेक इन्स्टाग्राम अकाउंट (“माही”) तयार करून केतनला लोहगडवर आणले. तसेच, २०२५ मधील मेघालय हनीमून मर्डर केस, पॉडकास्ट आणि ऑनलाइन रिसोर्सेसचा (अगदी ChatGPT पर्यंत) वापर करून कटाची रचना केल्याचे चार्जशीटमध्ये नमूद आहे.
कात्रज-कोंढवा रोडवर अपघाताची मालिका सुरूच ; ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून ८ वर्षीय मुलीचा मृत्यू
