पुणे -प्रतिनिधी
पोलिस स्टेशनला तक्रार देण्यासाठी निघालेल्या तरूणावर भर दिवसा कोयत्याने सपासप वार Koyta Attack केल्याची धक्कादायक घटना पर्वती दर्शन Parvati Darshan परिसरात घडली . याप्रकरणी पोलिसानी एका 18 वर्षीय आरोपीला जेरबंद केले आहे .
नेमक काय घडलं ?
तक्रारदार निलेश चंद्रकांत धुमक Nilesh Dhumak (वय 30) हे शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास आपल्या घरी जनता वसाहत, पर्वती पायथा येथील गल्ली क्रमांक 37 येथे दुपारचे जेवण करत होते तेंव्हा त्यांचे काहीतरी कारणावरून वडिलासोबत भांडण झाले .तेंव्हा या तुमच्या रोजच्या भांडणाच्या आवाजाचा आम्हाला प्रचंड त्रास होतो असे शेजारी राहणारा वैभव गणेश वेदपाठक Vaibhav Vedpathak (वय 18) म्हणाला आणि त्याने तक्रारारदार यांना शिवीगाळ करून मारहाण केली .
मारहाणीची तक्रार देण्यासाठी नीलेश हा पोलिस स्टेशनला निघाला तेंव्हा भर रस्त्यात वैभव याने त्याला अडवले . आणि थेट सपासप कोयत्याने वार केले . या गंभीर हल्ल्यात नीलेश जखमी झाले . पण तरीही स्वताला सावरत कसे बसे पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली . पर्वती पोलिसानी गुन्हा दाखल करून तात्काळ तपासाला सुरुवात केली . आणि गुन्हा करून फरार झालेल्या वैभव गणेश वेदपाठक याच्या मुसक्या आवळल्या . या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून एकच चर्चा सुरू आहे . या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश खिलारी psi Prakash Khilari करत आहेत .
