पुणे -प्रतिनिधी
राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढत चालली आहे. राज्यातील वेगवेगऴ्या भागातून खून, मारामाऱ्या, दरोडे, लुटमार यासारख्या घटना दररोज उघडकीस येत असतात. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात आहेत. मात्र प्रत्येक घटना रोखण्यात पोलिसांनाही यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे आशातच आता शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी एक मोठी बातमी समोर आली आहे . शिरूर मध्ये मुलाने वयोवृद्ध 60 वर्षीय आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तिची हत्या केल्याची खळबजनक घटना उघडकीस आली आहे ,(Nimagav Mhalungi)
मृत महिलेचे नाव कुंदा रामोबा चौधरी (Kunda Chaudhari) (वय 60) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास आरोपी दिलीप रामोबा चौधरी (Dilip Chaudhari) याचा त्याच्या आईसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद वाढल्यानंतर आरोपीने आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर घरातील एका कठीण वस्तूने तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत कुंदा चौधरी गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.(Shirur Homicide)
घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी दिलीप चौधरी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.
या घटनेमुळे निमगाव म्हाळुंगी गावासह संपूर्ण शिरूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडली की त्यामागे अन्य काही कारण आहे, याचा शिक्रापूर पोलीस सखोल तपास करत आहेत. चौकशीनंतर या प्रकरणातील नेमकी कारणे स्पष्ट होणार आहेत.
