पुणे -प्रतिनिधी
घरात रात्री आईवडिलांसोबत झोपलेल्या पाच वर्षाच्या चिमुकलीचा बुधवारी पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला . (Shirur Leopard Attack )शिरूर तालुक्यातील पिंपळसूटी येथील फलके मळा परिसरात हि घटना घडली आहे . (Pimpal sutiTragedy)
भाग्यश्री संदीप वारे (Bhagyashre eWaghmare)(वय ५ वर्ष रा. पाथर्डी जि.आल्हिल्यानगर) असे मृत मुलीच नाव आहे .भाग्यश्री दिवसभर अंगणात खेळून रात्री जेवण करून आई वडिलांसोबत झोपी गेली .पहाटेच्या साखर झोपेमध्ये बिबट्याने मुलीवर हल्ला केला . मुलीचा ओरडण्याचा आवाज आला असता तिचे आईवडील जागे झाले यावेळी बिबट्या भाग्यश्रीला फरफटत नेत होता यावेळी तिच्या आई-वडिलांनी आरडाओरडा केला परंतु बिबट्याने मुलीसह उसाच्या शेतात धूम ठोकली होती. (Pune Distric tNews)
जुना वाद उफाळून आला ; टोळक्यांने डोक , हात ,अन चेहऱ्यावर तब्बल ३० वार करून १७ वर्षीय युवकाची केली हत्या…. पोलिसांनी असा शिकवला गुन्हेगारांना धडा
घटनेची माहिती मिळताच वन विभाग कर्मचारी व ग्रामस्थांच्या मदतीसाठी पुढे आले .तेंव्हा घरापासून 50 मीटरच्या अंतरावर मुलीचा मृत्यू देह उसाच्या शेतात आढळून आला. त्यानंतर तिला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.
बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करा
या परिसरातील बिबट्याने हल्ला केल्याची हि पाचवी घटना आहे . या परिसरात बिबटे मुक्तपणे वावरत असल्याचा दावा स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे .वारंवार घटना होत असतानाही वनविभाग ठोस उपाययोजना करत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे .
