पत्नी-मुलं गाढ झोपेत असतानाच घरात कोणीतरी शिरलं. काही मिनिटांतच घडलेल्या प्रकारामुळे सकाळी संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला. नेमकं काय घडलं याची चर्चा परिसरात रंगली असून या घटनेने अनेकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं.(Pune Crime)
पुणे – प्रतिनिधी
रात्रीच्या शांत वेळी घडलेल्या एका घटनेने पुण्याच्या वानवडी परिसरातील रहिवासी अक्षरशा थरथरले आहेत .घर सुरक्षित समजून गाढ झोपेत असलेल्या एका कुटुंबाला जाग आली धक्कादायक सत्य समोर आल नेमक
या परिसरातील घरात काय प्रकार घडला याचा थरार भयंकर आहे (Crime Alert )
मध्यरात्री काय घडलं ?
मिळलेल्या माहितीनुसार पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात 65 वर्षीय ठेकेदार परमार पार्क येथील बंगल्यात राहतात .कुटुंबात पत्नी सासू आणि मुले यांचा समावेश आहे .नेहमीप्रमाणे सोमवारचा दिवस संपवून सर्व कुटुंबीय घरात झोपले होते . तेंव्हा हि धक्कादायक घटना घडली . खर तर मंगळवारी ( २१ जुलै ) पहाटे साधारण सुमारे तीनच्या सुमारास अज्ञात व्यक्ती घरात आले .
तीन चोरटे बंगल्याच्या पाठीमागील बाजूने आले. त्यांनी मागील दरवाजावरील लोखंडी जाळी कापून बंगल्यात प्रवेश केला.त्यावेळी घरातील सर्वजण गाढ झोपेत होते .बंगल्यात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी ठेकेदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना शस्त्राचा धाक दाखवत धमकावले. त्यानंतर त्यांनी घरातील शयनगृहातील कपाट उघडून हिरेजडीत सोन्याचे दागिने आणि चोरट्यांनी तब्बल २७ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना समोर आली .एवढेच नाही तर ,चोरट्यांनी
ठेकेदाराची पत्नी आणि सासू यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिनेही धमकावून हिसकावून घेतले. आणि चोरटे तेथून पसार झाले. संपूर्ण घटना काही मिनिटांत घडली .(Wanwadi Robbery )
घटनेची माहिती वानवडी पोलिसांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली .सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करत काही परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस अज्ञात चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.
