पुणे : प्रतिनिधी
फुरसुंगी Fursungi परिसरातील गुटखा विक्रेत्याला कारवाईची भीती दाखवून 1 लाख 65 हजारांची खंडणी उकळल्याच्या आरोपावरून पोलीस अंमलदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. Pune Police पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल यांनी रामकिशन धोंडिबा हंबर्डे Ramkishan Hambarde यांना तातडीने निलंबित केले.Pune News
हंबर्डे Ramkishan Hambarde आणि सतीश मोरे यांनी संगनमताने गुटखा विक्रेत्याविरुद्ध कारवाई करण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. यापैकी एक लाख ६५ हजार रुपये घेतल्याच्या तक्रारीवरून फुरसुंगी पोलीस ठाण्यात ११ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Police Suspension
दरम्यान, अवैध गुटख्यावरील कारवाईची भीती दाखवून संबंधित विक्रेत्याकडून एक किलो काजू-बदाम घेतल्याचा आरोपही समोर आला आहे. यासंदर्भातील व्हिडिओ क्लिप सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्याचे निदर्शनास आले आहे.
फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी या प्रकरणाचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला होता. या प्रकारामुळे पोलीस दलाच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणात तक्रारीतील आरोपांचा तपास सुरू असून, पुढील चौकशीनंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
पुण्यात गुंडगिरीचा कहर ; पोलिसात तक्रार देण्यासाठी निघलेल्या तरूणावर भरदिवसा कोयत्याने सपासप वार
