पुणे -प्रतिनिधी
मंचर तालुक्यातील तपनेश्वर स्मशानभूमीजवळील विहिरीत आज (ता. ३ एप्रिल २०२६) सकाळी सव्वा आठ वाजता धक्कादायक घटना घडली. (Manchar Tragedy)कौटुंबिक वादातून विवाहित हर्षदा आशिष बाणखेले (वय ३५) यांनी १४ वर्षीय मुलगी परिज्ञाने (परिज्ञा आशिष बाणखेले) गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ६ वर्षीय मुलाला सोबत घेऊन विहिरीत उडी घेतली.(Family Murde Attempt )
या घटनेत नेहाल आशिष बाणखेले (Nehal Bankhele )(वय ६) निधन झाले, तर आई हर्षदा (Harshada Bankhele)आणि मुलगी परिज्ञा गंभीर जखमी आहेत. दोघांवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैद्यकीय तपासात नेहालचा मृत्यू झाल्याचे घोषित झाले .(Manchar Well Incident)
घटनेची माहिती:
विहिरीतून मोठा आवाज आल्याने नगरसेवक वसंतराव बाणखेले, सचिनराव बाणखेले, संजय वामनराव बाणखेले व गणेश बाणखेले यांनी तात्काळ मदत केली. त्यांनी आई-मुलाला विहिरीतून बाहेर काढले .
पती आशिष बाणखेले यांना कळल्यानंतर त्यांनी सदनिकेत जाऊन परिज्ञाला अत्यावस्थ अवस्थेत सापडले. प्राथमिक तपासात तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले .
पोलिस कारवाई:
मंचर पोलिस ठाण्यात आशिष बाणखेले यांची फिर्याद होत आहे. वरिष्ठ PI श्रीकांत कंकाळ, API सुनील बडगुजर व PS गणेश डावखर यांनी पंचनामा केला. प्राथमिक माहितीनुसार, हर्षदा गेल्या ५-६ वर्षांपासून स्वतंत्र राहत होत्या. पुढील तपास सुरू आहे .
परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
