पुणे, ३ एप्रिल २०२६:
शिवसेना (शिंदे गट) पुणे लोकसभा संपर्कप्रमुखपदी निवडीनंतर मंत्री उदय सामंत (Uday Samant)यांनी पुण्यात पहिली मोठी आढावा बैठक घेतली. (ShivSena Pune )या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुणे शहरातील शिवसेनेच्या (Shinde Sena)संघटनात्मक रचनेत आमूलाग्र बदल घडवणार असल्याचे संकेत देत सध्याच्या सर्व पदांवर नियुक्त्यांना तात्काळ स्थगिती दिल्याची धक्कादायक घोषणा केली. महापालिका निवडणुकीतील अपयशानंतर पक्षाची पुनर्रचना करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.(Pune Politics)
मंत्री सामंतांची प्रमुख विधाने
मंत्री सामंत यांनी स्पष्टपणे सांगितले की, (ShivSena Reset)”पुणे महानगरपालिकेत झालेल्या अपयशानंतर शिवसेना पुन्हा शून्यातून उभी करण्यासाठी सतत बैठका घेत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्पष्ट आदेशानुसार पुणे शहर, जिल्हा आणि महानगरप्रमुखांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व पदांना सध्या पूर्ण स्थगिती देण्यात आली आहे.() पक्षात गटबाजीला मुळीच थारा नसून, आगामी काळात केवळ ताकदीचे, समर्पित कार्यकर्ते निवडून मजबूत नवी कार्यकारिणी घडवली जाणार आहे.” तसेच, महापालिकेच्या १२० उमेदवारांची स्वतंत्र बैठक लवकरच घेणा (Maharashtra News)र असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
नीलम गोऱ्हे वरून वाद?
विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर होत असलेल्या आक्षेपांबाबत बोलताना सामंत यांनी त्यांची ठाम पाठराखण केली. “नीलम ताईंनी त्यांची भूमिका स्वतः स्पष्ट केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील अपयश असले तरी आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाखालीच संघटना पुन्हा उभी करायची आहे.(Pune Breaking) शिवसेनेत केवळ एकनाथ शिंदे यांचाच गट आहे; सर्वजण एकच!” असे म्हणत त्यांनी पक्षातील एकजुटीचे पुन्हा प्रदर्शन केले.
इतर राजकीय उल्लेख
आमदार धंगेकरांबाबत: “ते एक वेगळे रसायन आणि अभ्यासू नेते आहेत. योग्य वेळी ते सर्व विषयांना वाचा फोडतील.”
मुख्यमंत्री शिंदे वर आरोप: “एकनाथ शिंदे यांनी कर्तृत्वाने काम केले आहे; त्यांना कोणाचेही प्रमाणपत्र लागत नाही. कॅप्टन खरात यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे.”
अजित पवार निधन: “ही दुर्दैवी परिस्थिती आहे. अजित पवार यांच्या निधनानंतरची निवडणूक बिनविरोध व्हावी ही आमची भूमिका. यावर राजकीय पोळी भाजू नये,” असे सामंत यांनी सर्व राजकीय पक्षांना आवाहन केले.
पुणे शिवसेनेत या घोषणेमुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, नव्या कार्यकारिणीची उत्सुकता वाढली आहे.
