पुणे – प्रतिनिधी
मद्याच्या नशेत कार चालवून अपघातात दोघांच्या मृत्यूप्रकरणातील अभियंता आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने हा आदेश दिला असून, ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तसेच अटी शर्तींवर हा जामीन देण्यात आला आहे. सासवड-विर मार्गावरील तीव्र वळणावर हा अपघात झाला होता.(SaswadAccident)
याप्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होता.(DrunkDrivingCase ) या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर दोघे जखमी झाले होते. ही घटना गेल्या महिन्यात घडली होती. (EngineerAccused)
आरोपीतर्फे ॲड. आनंद वि. आरु यांनी आरोपीतर्फे दाखल केलेल्या अर्जावर आरोपपत्र दाखल होण्यापूर्वी जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मिळविण्यासाठी अर्ज केला होता. (B4ChargesheetBail )अॅड. आरू (Advaaru) यांनी न्यायालयात अंतिम युक्तिवाद करून आरोपीची बाजू मांडली. आरोपी १८ एप्रिलपासून न्यायालयीन कोठडीत असून,त्याचे वाहन जप्त केलेले आहे. तपासासाठी आरोपीला कोठडीची आवश्यकता नाही असा युक्तीवाद आरोपीतर्फे करण्यात आला. (PuneCourt)दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर केला. दरम्यान, केवळ २१ दिवसांत हा जामीन मंजूर झाला आहे, असे आरोपीचे वकिल आनंद आरू यांनी सांगितले.
याप्रकरणात आरोपपत्र दाखल होण्यापूर्वी आम्ही न्यायालयात प्रभावी मांडणी केली. नंतर न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर केला. या निर्णयामुळे “बी-फोर चार्जशीट बेल” संदर्भातील कायदेशीर चर्चांना पुन्हा एकदा चालना मिळाली आहे. या प्रकरणात ॲड. प्रसाद निकम आणि आमोल डांगे यांनी विशेष सहकार्य केले.
