बारामती -प्रतिनिधी
बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज (ता. ६ एप्रिल २०२६) महायुतीने भव्य शक्तिप्रदर्शन केले.(Baramati By Election ) यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल (Praful Patel )यांनी बारामती लोकसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन करून राजकीय वर्तुळ हादरवले.(Unopposed Election)
प्रफुल पटेलांचे स्पष्ट मत:
“बारामतीच्या जनतेने अजितदादांवर जसे जीवापाड प्रेम केले, तसेच प्रेम सुनेत्रा वहिनींनाही द्यावे. इतर पक्षांनी उमेदवार न देता त्यांना बिनविरोध निवडून द्यावे – हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे प्रफुल पटेल म्हणाले. त्यांनी काँग्रेस अध्यक्षांशी बिनविरोध निवडणुकीसाठी चर्चा सुरू असल्याचे सांगितले.(MahayutiRally)
विरोधकांवर टीका:
शहरात लावलेल्या विरोधकांच्या बॅनरांबाबत बोलताना पटेल यांनी कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले, “कोणाच्या पोटात काय दुखत आहे, यावर मी बोलणार नाही. जय पवार यांचे उत्तरच अंतिम सत्य आहे.” बारामतीत उसळलेल्या जनसागराने अजितदादांना श्रद्धांजली वाहिल्याचेही त्यांनी नमूद केले.
