पुणे – प्रतीनिधी
लोहगड किल्ल्यावरून केतन अग्रवाल (Ketan Agrawal) याचा खून झाल्यानंतर त्याची भावी पत्नी सिया गोयल हिला बेड्या ठोकण्यात आल्या ,. सियाला अटक केल्यानंतर तिच्याबाबतच्या अनेक धक्कादायक आणि चकित करणाऱ्या गोष्सठी समोर आल्या आहेत. सिया (Siya Goyal) हि ड्रिंक करत होती ,तिला अनेकदा हे सर्व बंद कर तसेच अशा पार्ट्यांना जायचं नाही असे हि सांगितलं होत असे केतनची आईच म्हणन आहे त्यावर आता सियाची आई ने प्रतिक्रिया देत सवाल उपस्थित केला आहे .माझी मुलगी ड्रिंक्स करत नव्हती, असं सांगतानाच इतके दिवस माझी मुलगी चांगली होती. आताच माझी मुलगी वाईट कशी दिसू लागली? असा सवाल सियाची आई पूजा गोयल यांनी केला आहे.(Pooj aGoyal)
लोहगडवरील केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणानंतर मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिच्या कुटुंबीयांबाबत सुरू असलेल्या चर्चेला नवा वळण मिळाले आहे. सिया हिची आई पूजा गोयल यांनी माध्यमांशी बोलताना मुलीची बाजू मांडत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले. “माझी मुलगी ड्रिंक्स करत नव्हती. तिच्या ड्रिंक्स आणि पार्टीबाबत केतनच्या कुटुंबीयांनी कधीच आम्हाला सांगितलं नाही. ती ड्रिंक करायची हे पहिल्यांदाच कळलं,” असं त्या म्हणाल्या. कालपर्यंत सियाची प्रतिमा चांगली दाखवली जात होती; आज मात्र तिची बदनामी सुरू झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
पूजा गोयल म्हणाल्या, “सिया आणि केतनच्या लग्नाबाबत आम्हाला बऱ्याच अपेक्षा होत्या. अग्रवाल कुटुंब सियावर खूप प्रेम करत होतं. सियाच्या वाढदिवसाचं आयोजनही त्यांनीच केलं होतं. सिया आणि केतनचं जमत नसेल तर आम्हाला स्पष्टपणे सांगायला हवं होतं. मुलीने लग्नाला कधी विरोध केला नव्हता.” त्या पुढे म्हणाल्या, “केतनसोबत आमचं रोज बोलणं व्हायचं. सकाळी–संध्याकाळी तो व्हिडीओ कॉल करायचा. तो अत्यंत चांगला मुलगा होता. अग्रवाल कुटुंबाने मुलगा गमावला, तसाच आम्हीही आमचा मुलगा गमावला आहे.”
लग्नाच्या तयारीविषयी बोलताना पूजा गोयल यांनी उदयपूर येथील अनंत रिसॉर्ट बुक केल्याची माहिती दिली. “लग्नासाठी १४–१५ कोटींचा प्रश्न नव्हता. रिसॉर्टसाठी सुमारे ३ कोटी, तर लग्न सोहळ्यासाठी ५ ते ५.५ कोटी खर्च अपेक्षित होता. जेट बुक झाले नव्हते; जुलै एंडिंगला बुकिंग करायची योजना होती,” असं त्यांनी सांगितलं. “मला सियापेक्षा केतन अधिक जवळचा वाटत होता; दोघांवर आमचं प्रेम आणि जवळीक होती. पण असं व्हायला नको होतं. ज्याने जे केलं, त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे – आरोपीला फाशी किंवा लोहगडावरूनच कडेलोट करा,” अशी कठोर मागणीही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, केतन हत्याकांड प्रकरणात सिया गोयल हिचे आई–वडील आणि भाऊ साहिल (Sahil Goyal) यांची लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून गेल्या चार तासांपासून कसून चौकशी सुरू आहे. साहिलला यापूर्वी चौकशीसाठी पुन्हा हजर राहण्याची नोटीस देण्यात आली होती. या चौकशीतून हत्याकांडाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, तपासाला नवे धागेदोरे मिळतील अशी अपेक्षा आहे.
लोणावळ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी सांगितले की, “सियाच्या आई–वडिलांची चौकशी चालू आहे. गरज भासल्यास इतरांचीदेखील चौकशी केली जाईल. साहिल आणि चेतन एकत्र क्रिकेट खेळत होते; दोघांची मैत्री होती. त्यातून सियाची ओळख झाली का, याचाही तपास सुरू आहे. सखोल तपासासाठी वेगवेगळ्या पथकांची निर्मिती करण्यात आली आहे.”
