पुणे – प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वरूडे (Varude) गावातून अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे .घरात उकडत म्हणून अंगणातील घराबाहेरील ओट्यावर झोपलेल्या ४३ वर्षीय व्यक्तीची धारदार कोयत्याने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची थरकाप उडवणारी घटना घडली आहे. (Shirur Taluka) या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
वरूडे येथील रानमळा परिसरातील बाळासो बबन तांबे (Balaso Tambe) (वय ४३) हे उकाड्यामुळे घराबाहेरील ओट्यावर झोपले होते. ८ जून रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यावर कोयत्याने सपासप वार करून त्यांची जागीच हत्या केली.(Pune Rural) सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळताच गावात एकच खळबळ उडाली आणि ही हत्या कुणी व कोणत्या कारणासाठी केली, याबाबत विविध चर्चांना ऊत आला.(Minor Accused)
घटनेनंतर शिक्रापूर पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.(Revenge Killing) मयताच्या हालचाली, पूर्वीचे वाद, गावातील संबंध आणि संशयितांची माहिती तपासताना पोलिसांच्या हाती महत्त्वाचा धागा लागला. (Murder Case)तपासादरम्यान गावातीलच एका अल्पवयीन मुलाचे नाव समोर आले. त्याची पालकांसमक्ष चौकशी केल्यावर त्याने खुनाची धक्कादायक कबुली दिली.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सुमारे दोन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग आणि काही दिवसांपूर्वी झालेल्या शिवीगाळ व धमकीचा सूड मनात धरून या अल्पवयीन मुलाने तांबे यांची हत्या केल्याचे उघड झाले.(Villag eMurder) रागाच्या भरात त्याने पहाटे झोपेत असलेल्या तांबे यांच्या गळ्यावर कोयत्याने वार करून त्यांचा जीव घेतल्याची कबुली दिली. पोलिसांनी खुनासाठी वापरलेला लोखंडी कोयता जप्त केला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव (PI Chnadrashekhar yadav ) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे व त्यांच्या पथकाकडून सुरू आहे. अल्पवयीन मुलाकडून केवळ सूडाच्या भावनेतून झालेल्या या हत्येमुळे वरूडे गावात हळहळ आणि संताप व्यक्त होत आहे.
