Pune Crime : मुंढव्यात चाललंय तरी काय ? 15 दिवसात 3 खून, महिला ब्युटीपार्लर चालकसह कोणा-कोणाची झाली हत्या?

पुणे – प्रतिनिधी

पुण्यातील मुंढवा पोलिस स्टेशन च्या हद्दीत खुनाचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. (Mundhwa) गेल्या पंधरा दिवसांत पुण्यात लागोपाठ तीन खुनाच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे प्रचंड सावट निर्माण झाले आहे.शनिवारी सकाळी मुंढवा झेड कॉर्नर येथे एकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्या तरुणाची आणखीन ओळख पटली नसून ,मात्र, गेल्या १५ दिवसांत या भागात ही तिसरी हत्येची घटना आहे.(MundhwaMurders)

मुंढवा झेड कॉर्नर (ZCorner) भागात जखमी अवस्थेत तरूण आढळल्याची माहिती सकाळी पावणेआठ वाजता पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली. मुंढवा पोलिसांचे अधिकारी आणि तपास पथक घटनास्थळी दाखल झाले. (MundhwaCrime) त्यावेळी एकजण रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत दिसला. त्याला रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. घटनास्थळी सापडलेल्या मोबाईल मिळून आला असून , पोलिसांकडून मोबाइल च्या आधारे ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.(PuneCrime)

काही दिवसांपूर्वी ब्युटी पार्लर चालक असलेल्या आफरीन सलीम पठाण (वय २९) यांचा गळा दाबून खून झाला होता; तिच्या प्रकरणातील आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली ,तर तसेच, दारू पिताना झालेल्या वादातून मित्राने डोक्यात दगड घालून खून केल्याची आणखी एक घटना याच परिसरात घडली होती.लोकेश मानसिंग ठोंबरे (वय ३०) असे मृताचे नाव असून, या प्रकरणात अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले होते.(CrimeSpike )

पुणे शहरातील मुंढवा परिसरात पंधरा दिवसांच्या अंतराने झालेल्या या तिसऱ्या खुनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आशा या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण असून पोलीस प्रशासनाकडून कडक पावले उचलण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *