Pune Crime : चेतन ‘ साठी केली केतन ‘ ची हत्या … पोलीस तपासात धक्कादायक खुलासा , होणारी पत्नीच निघाली धोकेबाज …

पुणे -प्रतिनिधी

लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झाल्याचा घटनेचा तपास करताना पुणे ग्रामीण पोलिसांच्या चौकशीत केतन विशाल अग्रवाल (वय 25) याच्या मृत्यूचा प्रकार सहकार्याने रचलेला खून असल्याचे उघड झाले आहे. (Lohagad Murder)केतनच्या होणाऱ्या पत्नी सिया गोयल आणि तिच्या सहकार्याचा आरोप आहे की त्यांनी संगनमताने केतनला लोहगडावर नेऊन दरीत ढकलून त्याची हत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 18 जून रोजी लोहगड किल्ल्याच्या पश्चिमेकडील भागातील झुडपांत केतनचे (Ketan Agrawal)मृतदेह अढळला . सुरुवातीला सिया गोयलने (Siyagoyal)पोलिसांना सांगितले की केतनाचा पाय घसरून तो दरीत पडला. त्या घोषणेनंतर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.(Pune Rural Police)

घटनेचे स्वरूप संशयास्पद आढळल्याने पोलिस अधीक्षक संदीप सिंह (Sp sandip gil) गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि नातेवाईकांच्या माहितीच्या आधारे संकलित तपासात सिया आणि चेतन चौधरी यांच्यात गेल्या वर्षभरापासून प्रेम संबंध
असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तपासाची दिशा बदलली आणि हत्येचा कट समोर आला.

पोलिसांच्या माहितीनुसार फेब्रुवारीमध्ये सियाचा केतनशी साखरपुडा झाला होता, परंतु ती ते लग्न मान्य नसल्याचे चौकशीत समोर आले आहे. सिया आणि चेतन च्या प्रेमाच्या नात्यात केतन अडथळा ठरला म्हणून सुमारे आठवडाभरताच खुनाचा कट आखण्यात आला होता. योजनेनुसार 18 जूनला सियाने केतनला लोहगडावर नेले; चेतन (Chetan Chaudhary)आधीच किल्ल्याच्या परिसरात आला होता आणि नंतर संधी मिळताच केतनला दरीत ढकलल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या नंतर सियाने आरडाओरडा करून हा अपघात असल्याचा बनावट प्रसंग तयार केला आणि सुरक्षा रक्षकांसह केतनच्या कुटुंबीयांना बातमी दिली.

केतनच्या वडील विशाल अग्रवाल यांच्या तक्रारीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात (Lonavala Police) भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत खुनाचा गुन्हा नोंदवून सिया गोयल व चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे.

तपासात समोर आली माहिती :

केतन हा अनुभवी ट्रेकर होता; त्यामुळे कुटुंबीयांना अपघाताचा दावा शंका उत्पन्न करणारा वाटला.

सियाने केतनला वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी नंतर 19 जूनला महाबळेश्वरला नेण्याचा प्रस्ताव नाकारल्यामुळे 18 जूनला किल्ल्यावरून नेण्याचा आग्रह धरल्याची माहिती आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात नियोजित बाली ट्रिप रद्द झाल्यावर पोलिसांनी तपासात दावा केला की केतनचा पासपोर्ट सियाने लपवून ठेवल्याचा संशय आहे.

चेतनने घटनेच्या दिवशी स्वतःचा मोबाईल घरी ठेवला आणि हुडी व हेडफोन वापरून ओळख लपवण्याचा प्रयत्न केला, असे पोलिसांना आढळले आहे.

तिन्ही घटकांच्या कुटुंबांचा व्यावसायिक संबंध असून ते पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील व्यापाराशी निगडीत असल्याचेही तपासात समोर आले आहे.

पुणे ग्रामीण पोलीस अधिक तपास करत असून सीसीटीव्ही, मोबाइल डेटासह आणखी तांत्रिक व पुराव्यांचे परीक्षण सुरू आहे. पुढील सुनावणीपूर्वी तपासानुसार आणखी कायदेशीर कारवाई होणार आहे ते पोलिस अधीक्षकांकडून जाहीर केले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *