पुणे -प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावर (Lohagad) होणाऱ्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त ट्रेकिंगसाठी गेलेल्या केतन अग्रवालचा (Ketanagrawal)मृत्यू झाला होता पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तपासानंतर धक्कादायक खुलासा झाला आहे:केतनचा गडावरून पडून नाही तर त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. होणाऱ्या बायकोनेच तिच्या मित्राच्या मदतीने केतन चा काटा काढला आहे .
नेमकं काय काय झालं होतं. पोलिसांनी मर्डर मिस्ट्री कशी सोडवली? पाहा
चार दिवसांपूर्वी पुणे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लोहगडवर किल्ल्यावरून केतन 400 फूट खोल दरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला.सुरुवातीला हा अपघात असल्याचा अंदाज पोलिसानी व्यक्त केला होता. पण यामागे मोठा कट रचला गेला होता.
लोहगड पोलीस ठाण्याच्या तपासात केतनच्या मृत्यू च्या पार्श्वभूमीवर मर्डर प्लॅन असल्याचे संकेत आढळल्याने गुन्हे विभागाने प्रकरण अधिक गांभीर्याने घेत तपास सुरू केला . (Pune Rural) पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया गोयल व तिच्या एका मित्राबद्दल चौकशी सुरू केली . तेंव्हा तपासात तांत्रिक पुरावे , मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR), टॉवर लोकेशन आणि इतर डिजिटल फूटप्रिंट — यांचा सखोल अभ्यास करण्यात आला .
लोहगड परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात हुडी घातलेला,आणि कानात हेडफोन लावलेला आणि चेहरा आंशिकपणे झाकलेला एक तरुण परिसरात फिरतानाचे फुटेज आढळले. या संशयिताची हालचाल आणि वेशभूषेने पोलीसांमध्ये संशय आला आणि पोलिसानी तपासची चक्र फिरवली तेंव्हा तपासादरम्यान मिळालेल्या तांत्रिक पुराव्यांमुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले , होणाऱ्या पत्नीनेच तिच्या मित्राच्या मदतीने केतन ची हत्या केल्याचे समोर आले .
सिया गोयलला केतन अग्रवालशी लग्न करायचे नव्हते. या विवाहाला विरोध असल्याने तिने आपल्या एका मित्राच्या मदतीने हा भयानक कट आखला. कटानुसार, केतनला लोहगड किल्ल्यावर घेऊन जाण्यात आले. तेथे योग्य वेळ साधून सिया आणि तिच्या मित्राने त्याला खोल दरीत ढकलून दिले. या घटनेत केतनचा जागीच मृत्यू झाला .
