येरवडा खुल्या जिल्हा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी संतोष लक्ष्मण भिंगारे (रा. पाचवाड, वाई तालुका, सातारा) (SantoshBhingare )शुक्रवारी दुपारी फरार झाल्याची घटना समोर आली.(YerwadaEscape) तुती बागेत सापडलेल्या बेवारस मोबाईलच्या चौकशीची भीती वाटल्याने त्याने पळ काढल्याचा संशय आहे .(OpenJail)
भुईज पोलीस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या भिंगारेंनी “जेवण करून येतो” असे सांगून बाहेर पडले आणि परत आले नाहीत. (LifeConvict)कारागृह अधिकारी नागनाथ भनवसे यांनी शोध घेतला असता तो सापडला नाही. (PrisonSecurity) येरवडा पोलीस ठाण्यात फरार गुन्हा दाखल करण्यात आला .(PunePolice)
घटनेनंतर कारागृह प्रशासनात खळबळ उडाली असून येरवडा पोलिस पथकांनी शोधमोहीम सुरू केली आहे. भिंगारे याची वैशिष्ट्ये जाहीर करून माहिती देणाऱ्यांना बक्षीस जाहीर करण्यात आले आहे .(FugitivePrisoner) या घटनेमुळे खुल्या कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून सखोल तपास सुरू आहे .
