पुणे -प्रतिनिधी
पुण्यातील गुलटेकडी परिसरात राहणारे बिल्डर खलील शेख (Khalil Sheikh) यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. बिल्डर शेख आत्महत्या प्रकरणात माजी आमदार आणि नगरसेवकासह 14 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणात अटकेची शक्यताही बोलून दाखवली होती. त्यामुळे सध्या रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)आणि त्यांची पत्नी प्रतिभा धंगेकर (Pratibha Dhangekar) हे दोघेही नॉट रिचेबल झाले आहेत.
नेमकं प्रकरण काय ?
बिल्डर खलील शेख यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. खलील शेख यांनी आत्महत्या करण्याआधी चिठ्ठी लिहिली. तसेच एक व्हिडिओ बनवल्याची माहिती समोर आली आहे. हा व्हिडिओ आणि आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. (Suicide Case) यात बिल्डर शेख यांनी गंभीर आरोप केले आहेत. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी या प्रकरणी महत्त्वाची अपडेट होती तसेच या प्रकरणातील आरोपींना कधीही अटक देखील होऊ शकते, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.यादरम्यानच आता अटक टाळण्यासाठी रवींद्र धंगेकर यांच्यासह त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर नॉट रिचेबल आहेत. (Allegations _Allegations) त्या दोघांनीही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. सोमवारी यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होईल.(Pune Police)
पुण्यात मुलीचा MBA ला प्रवेश करून परतणार अख्खं कुटुंब समृद्धीवर महामार्गावर संपलं …
पोलिसांनी अटक करु नये म्हणून सध्या रवींद्र धंगेकर आणि त्यांची पत्नी अज्ञातस्थळी गेले आहेत. दुसरीकडे धंगेकरांच्या शोधासाठी पुणे पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत .
