पुणे -प्रतिनिधी
समृद्धी महामार्ग झाल्यामुळे राज्यातील दळणवळण खूप सोपे झाले आहे. सामान्यांचे प्रवासाचे अनेक तास वाचले आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही अडथळ्याविना समृद्धी महामार्गावरून (Accident Samruddhi Highway Accident) प्रवास करता येतो. म्हणूनच इप्सित स्थळी लवकर पोहोचायचे असेल तर समृद्धी महामार्गाचा सर्रास वापर केला जातो. परंतु याच समृद्धी महामार्गावर याआधी अनेक भीषण आणि धक्कादायक अपघात झालेले आहेत. (Vardha Family) वेगात वाहन आल्याने काही वेळा अनेकांचा मृत्यू झाल्याचा घटना घडलेल्या आहेत. दरम्यान, आता याच समृद्धी महमार्गावर मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील चौघांसह पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. मुलीला MBA च्या शिक्षणासाठी पुण्याला सोडून माघारी परतत असताना टिपले कुटुंबावर काळाने घाला घातला.(Crash On Highway)
संपूर्ण कुटुंब मुलीला MBA प्रवेश मिळाल्याचा आनंद साजरा करत होते .मुलीला पुण्यात महाविद्यालयात सोडून संपूर्ण कुटुंब वर्ध्याकडे परतत होते .अन समृद्धी महमार्गावर काळाने घाला घातला. क्षणातच होत्याच नव्हत झाल चार जणाचा जीव गेला .(Fire After Crash)
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गावर इथेनॉलचा एक ट्रक पलटी झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे वाहने टप्प्याटप्प्याने दुसऱ्या लेनवरून सोडली जात होती. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या मिरचीने भरलेल्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कार ट्रकखाली अक्षरशः चिरडली गेली. धडकेनंतर ट्रकला अचानक आग लागली आणि काही क्षणांत सर्व काही जळून खाक झाले.
हि धडक इतकी भीषण होती कि ट्रक खाली अक्षरशा चिरडली गेली . या भीषण अपघातात कार चालक अंकुश राऊत (Ankush Raut) ,राजेश टिपले (Rajesh Tipale) , जान्हवी टिपले (Janhavi Tipale),आणि सुषमा टिपले (Sushma Tipale) या चौघांचा मृत्यू झाला .
चारित्र्याच्या संशयातून वाद अन पतीने मिक्सर च्या वायरने गळा आवळून केला खून ; स्वतःच गेला पोलीस ठाण्यात
मुलीच्या शिक्षणासाठी घरातून पुण्याकडे आलेले कुटुंब मुलीच्या MBA शिक्षणाचीप्रवेशाची प्रक्रिया करून मुलीला धीर देत आई-वडिलांनी निरोप घेतला. “काळजी घे… मन लावून अभ्यास कर…” असे शेवटचे शब्द कदाचित तिच्या कानात अजूनही घुमत असतील. पण हा निरोप आयुष्यातील शेवटचा निरोप ठरेल, याची कल्पनाही कोणाला नव्हती. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अपघातात मृत्यू पावलेल्या कुटुंबीय, नातेवाईकांना बळ मिळो, अशी प्रार्थना केली जात आहे.
