पुणे -प्रतिनीधी
कुटुंबीयांचा लग्नाला विरोध असतानाही आंतरजातीय लव मॅरेज केल्याच्या रागातून तरुणावर पिस्तूल आणि कोयत्यानं जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना सांगवी पोलिस स्टेशनच्या हद्दीतून समोर येत आहे . , ही घटना मंगळवारी (8 सप्टेंबर) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पिंपळे निलख परिसरात घडली .(Pune Crime)
अमोल अण्णासाहेब वीर (Amol Annasaheb Veer)(वय 33) हे गंभीर जखमी झालेल्या जावयाचे नाव आहे . याप्रकरणी सांगवी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला .
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार , अमोल वीर हे हॉटेल व्यवसाय करतात. त्यांनी सायली काळूराम लांडगे (Sayali Kaluram Landge) हिच्यासोबत प्रेमविवाह केला आहे. या विवाहाचा राग मनात धरून तिचे चुलते अनिल पांडुरंग लांडगे यांच्या सांगण्यावरून आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप अमोल यांनी केला आहे.
अमोल वीर यांच्यावर हल्ला करण्यासाठी रोहन लांडगे, संदीप लांडगे, हर्षद लांडगे आणि अनिल लांडगे हे चौघे आल्याचा आरोप आहे. आरोपींनी अमोल यांच्यावर पिस्तूल रोखून तसेच कोयत्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात येत आहे.\
हल्ल्यादरम्यान आरोपींच्या हातातील पिस्तूल खाली पडल्यानं मोठा अनर्थ टळला. पिस्तूल खाली पडल्यामुळे अमोल यांचा जीव वाचला. मात्र, त्यानंतर कोयत्यानं हल्ला करण्यात आल्यानं अमोल यांच्यासह अनिकेत वीर आणि दीपक वीर हे तिघेही जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. (Love Marriage)
पुण्यात मित्रानेच मित्राला संपवलं ; कारण ठरले उधारीचे ६०० रुपये ; रक्ताने माखलेल्या टॉवेलनं गूढ उकललं
गुन्हा दाखल : घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला . . पोलिसांनी दोन लोखंडी कोयते, एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. भारतीय न्याय संहिता, शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलिस कायद्यातील विविध कलमांनुसार कारवाई सुरू असून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.
