Pune : हडपसरमधील बॉम्बप्रकरणात मोठा ट्विस्ट ! आरोपीचा तो प्लॅन समोर ,ऐकून पोलिसही थक्क

पुणे -प्रतीनिधी
पुण्यातील हडपसर परिसरात नामांकित रुग्णालयाबाहेर बॉम्बसदृश्य वस्तू आढळून खळबळ उडालेल्या प्रकरणाचा पुणे पोलिसांनी छडा लावला आहे. पैसे उकळण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याप्रकरणी शिवाजी राठोड (ShivajiRokade) याला अटक करण्यात आली असून चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे.(HadapsarBombScare )

खंडणीसाठी बनाव
पोलिस तपासानुसार, आरोपीला उपचारासाठी सुमारे सात लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आला होता.(HospitalExtortion) मात्र इतकी रक्कम उपलब्ध नसल्याने त्याने डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाला घाबरवून पैसे उकळण्याचा डाव आखला. त्यासाठीच बॉम्बसदृश्य वस्तू ठेवून खंडणी मागण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.(BombLikeDevice)

दोन दिवसांचा शोध
ही घटना उघड झाल्यानंतर पुणे पोलीस, दहशतवादविरोधी पथक आणि बॉम्बशोधक पथक दोन दिवस सतर्क होते. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा माग काढण्यात आला. नियंत्रित स्फोट घडवून ती वस्तू निकामी करण्यात आली आणि पुढील तपास सुरू ठेवण्यात आला.(NagpurArrest)

रेल्वेतून पलायनाचा प्रयत्न
मूळचा सोलापूरचा असलेला आरोपी घटनेनंतर फरार झाला होता. तो रेल्वेने नागपूरच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळताच पुणे आणि नागपूर एटीएसने संयुक्त कारवाई केली. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव रेल्वे स्थानकावर ट्रेन थांबताच पोलिसांनी डब्यात प्रवेश करून आरोपीला ताब्यात घेतले.

घरातून मिळालेले पुरावे
आरोपीच्या घरावर छापा टाकल्यावर पोलिसांना डिजिटल घड्याळाचे पॅकेट आणि काही संशयास्पद साहित्य मिळाले. तसेच काही दुकानांमध्ये यूपीआयद्वारे व्यवहार झाल्याची माहिती मिळाल्याने त्याच्या हालचालींचा माग काढणे सोपे झाले. अखेर अनेक प्रयत्नांनंतर त्याला नागपूरमध्ये अटक करण्यात पोलिसांना यश आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *