पुणे – प्रतिनिधी
माहेरहून २ लाख रुपये आण, अन्यथा घरात ठेवणार नाही, अशी धमकी देत गरोदर महिलेला लाथाबुक्क्यांनी व पट्ट्याने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार आळंदी परिसरात (Alandi Abuse)समोर आला. पीडित अनघा सागर सुरवसे (२९, रा. इंद्रायणी पार्क) यांच्या तक्रारीवरून आळंदी पोलिसांनी पतीसह चार जणांवर कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे.(Pregnant Woman Assault )
पोलिस माहितीनुसार, अनघा यांचा विवाह सागर अनिल सुरवसे (३०) याच्यासोबत झाला. लग्नानंतर सासरच्या लोकांनी घरातील कर्ज फेडण्यासाठी पैशांची मागणी सुरू केली. गरोदर असतानाही त्यांनी तिची काळजी न घेता वारंवार त्रास दिला आणि धमकावले.(Domestic Violence)
या छळाला त्रस्त झालेल्या अनघा यांनी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.(Anagha Suravase) यात पती सागर अनिल सुरवसे, सासरे अनिल प्रेमनाथ सुरवसे (६०),(In Law Harassment) सासू मंगल अनिल सुरवसे (४९) आणि नणंद भाग्यश्री आतिश गोतारणे (३२) यांचा समावेश आहे. (Pune Crime)पोलिस तपास करीत असून, परिसरात संतापाची लाट उसळली आहे.(Dowry Demand)
