पुणे -प्रतीनिधी
काळेपडळ पोलिस ठाण्याच्या (KalePadel Police ) हद्दीत असलेल्या हडपसर येथील रेस्क्यू फाउंडेशनच्या महिला संरक्षणगृहातून २३ मार्च रोजी ११ बांगलादेशी महिलांचे धक्कादायक पलायन झाल्याची बाब उघडकीस आली. अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पिटा) (PITA Act )पुणे शहर व ग्रामीण (Shelter Home)पोलिसांच्या कारवायांतून सुटका झालेल्या या महिलांनी एकाचवेळी गुपचूप बाहेर पडल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, हा प्रकार घडून काही दिवस लोटले तरी संस्थेकडून अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही.(Human Trafficking)
ससाणे वस्ती येथील या संरक्षणगृहात मोठ्या संख्येने सुटका झालेल्या महिलांना तात्पुरते निवास दिला जातो. काही दिवसांनंतर त्यांना सोडले जाते. मात्र, येथून सतत महिलांचे पलायन होत असल्याची माहिती समोर येते. यावेळी ११ महिलांनी एकत्रितपणे पळ काढल्याने संशय वाढला असून, मिलीभगत असल्याची चर्चा रंगली आहे. (Pune Crime)
काळेपडळ पोलिसांनी याबाबत अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.(Women Escape)
या घटनेमुळे संरक्षणगृहातील सुरक्षा व्यवस्था, कर्मचारी जबाबदारी आणि देखरेखीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. देशभर बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्ध कठोर कारवाई सुरू असताना अशा महिलांचे पलायन आणि संबंधित यंत्रणेच्या ठोस हालचालींचा अभाव ही बाब अत्यंत चिंताजनक मानली जात आहे.
सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांकडून जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी यापुढे अशा घटनांवर तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
