पुणे – प्रतिनिधी
संगमवाडी परिसरातील एका कॅफेमध्ये बिबट्याच्या अवयवांची बेकायदेशीर तस्करी (Leopard Trafficking) सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे वन विभागाने छापा टाकून दोन तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत
आरोपींकडून बिबट्याची कातडी, पंधरा नखे आणि दोन सुळे जप्त करण्यात आल्या आहेत.(Pune Forest Dept)
वन विभागाला कॅफेमध्ये अवयवांची विक्री होणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर अधिकारी साध्या वेशात सापळा रचून तिथे पोहचले काही वेळातच दोन संशयी ग्राहक म्हणून आले आणि अवयवांची देवाणघेवाण सुरू केली. (Wild lifeProtection
)त्याचवेळी विभागाच्या पथकाने कारवाई करुन दोघांना ताब्यात घेतले.
अटक केलेल्यांची नावे आदेश रेवजी पारधी (Adosh Revji Pardhi)(वय २५) आणि शुभम बाळू पारधी (Shubham Balu Pardhi) (वय २१) अशी असून दोघेही जुन्नर तालुक्यातील वरखेडे डिंगोरे येथील रहिवासी आहेत. त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.(Sangamwadi Raid)
पुणे वनविभागाच्या म्हणण्यानुसार, बिबटा हा वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार अनुसूची क्रमांक १ मधील संरक्षित प्राणी आहे. या प्रकारचे गुन्हे गंभीर असून दोषी आढळल्यास तीन ते सात वर्षे कैद आणि दंडाची तरतूद आहे.(Leopard Parts)
प्रकरणात मोठ्या तस्करीच्या जाळ्याशी संबंधित घटक असण्याची शंका वर्तवण्यात येत आहे, त्यामुळे इतर संशयींचा शोध सुरू आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाच्या पथकाने केली असलेल्या तपासाचा भाग आहे.
वन्यप्राणी अवयवांची बेकायदेशीर तस्करी किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास नागरिकांनी तात्काळ वन विभागाच्या १९२६ या हेल्पलाइनवर माहिती देण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.(Forest Custody)
